ETV Bharat / city

Breaking News Live : दसरा मेळावासंपेपर्यंत ठाण्यात जड-अवजड वाहनांना बंद; वाहतुकीत बदल

author img

By

Published : Oct 4, 2022, 7:17 AM IST

Updated : Oct 4, 2022, 8:45 PM IST

Maharashtra Breaking news
Maharashtra Breaking news

20:43 October 04

प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात खासदार उदयनराजे भोसलेंनी केला अभिषेक

सातारा - खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी प्रतापगडावर जाऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत भवानी मातेला अभिषेक केला. तसेच त्यांच्या उपस्थितीत खंडे नवमीनिमित्त नवचंडी यज्ञ करण्यात आला. घटस्थापनेच्या दिवशी गडावर नवरात्रोत्सवाचा प्रारंभ आणि दसऱ्याला सांगता होते. नऊ विविध कार्यक्रम होतात. अभिषेक आणि नवचंडी यज्ञ विधीवेळी प्रतापगडचे किल्लेदार अभयसिंह हवालदार, श्रीकांत फडणीस, आनंद उतेकर, विलास मोरे, ओमकार देशपांडे, विलास जाधव, विजय कासुर्डे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

20:42 October 04

या देशात कोणताही आरोप सिद्ध होण्याआधीच लोकांना तुरुंगात जावे लागतंय याबद्दल खेद - जयंत पाटील

कोल्हापूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळाला याचे समाधान आहे मात्र, किती महिन्यांनी जामीन मिळाला ? कोणताही आरोप सिद्ध नाही झाला. कोणीतरी सांगतात मात्र याने त्याच्याकडे पैसे मागितले याचाही पुरावा नाही. तरीही 40 वर्षे राजकारण घालवलेल्या नेत्याला इतके दिवस तुरुंगात राहावे लागले याचा आम्हाला खेद वाटतो असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी म्हंटले.

20:42 October 04

दसरा मेळावा विसर्जन संपेपर्यंत ठाण्यात जड-अवजड वाहनांना बंद-वाहतुकीत बदल

ठाणे - उद्या नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. यंदा जल्लोष असून विसर्जनासाठी मिरवणूक, निघणार आहेत. मिरवणुकीला वाहतूक अडथळा येऊ नये म्हणून ठाणे शहर वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल केलेले आहेत. दुर्गा मातेचे विसर्जन संपेपर्यंत ठाणे शहर हद्दीत जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी केल्याचे कळविले आहे.

20:41 October 04

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने महागाईचा रावण दहन

पुणे: लोकशाही विरोधी धोरण, महीला अत्त्याचार, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, सरकारी कंपन्याचे खाजगीकरण इंधन दरवाढ याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महागाई रावण दहन आंदोलन करण्यात आली आहे.

19:41 October 04

भिवंडीतून पीएफआयच्या बांगलादेशी तरुणाला अटक

ठाणे - भिवंडीतून पीएफआय संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या पाठोपाठ एका बांगलादेशी तरुणालाही अटक केली आहे. भिवंडी शहर पोलिसांनी शहरातील ताडाली परिसरात सापळा रचून त्याला अटक केली आहे. मोह. मोहसीन बादशाह मिया कोबीर (३०) असे गजाआड करण्यात आलेल्या बांगलादेशी तरुणाचे नाव आहे. नुकतेच देशभर कारवाई करुन पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. आता ही त्यांच्या हालचालींवर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आहे.

19:05 October 04

शिंदे गटाच्या वाहनांच्या ताफ्याला समृद्धी महामार्गावर अपघात

औरंगाबाद - शिंदे गटाच्या वाहनांच्या ताफ्याला समृद्धी महामार्गावर अपघात झाला. शिवसेनेच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे निघाले होते. यातील ८ ते १० वाहने एकमेकांवर धडकली. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

18:42 October 04

मुंबईत १५५ नव्या कोरोना रुग्णांची आज नोंद

मुंबई - मुंबईत आज कोरोना रुग्णात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. मुंबईत १५५ नव्या कोरोना रुग्णांची आज नोंद झाली आहे. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या ७८४ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

18:31 October 04

जिओची दसऱ्याला दिल्ली, मुंबई, कोलकातासह वाराणसीमध्ये 5G सेवेची बीटा ट्रायल

जिओ दसऱ्याच्या दिवशी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G सेवेच्या बीटा ट्रायल सुरू करणार आहे. रिलायन्सच्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

17:28 October 04

देवनार स्वामी समर्थांच्या मठात दानपेटीतील १४ हजारांची रक्कम चोरली

मुंबई - देवनार येथील स्वामी समर्थांच्या मठाच्या छप्पराचे पत्रे उचकटून दानपेटीतील १४ हजार रुपयांची रक्कम चोरली.

16:52 October 04

317 कोटी रुपयांचे बनावट चलन गुजरातमध्ये जप्त

गांधीनगर - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीच्या 67 कोटी नोटांसह 317 कोटी रुपयांचे बनावट चलन गुजरातमध्ये जप्त करण्यात आले. या कारवाीत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये काळ्या पैशाचे पांढरे करण्यासाठी ट्रस्ट, कंपनी आणि कमिशनच्या नावाखाली आरोपींनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. आता या नोटांचे प्रिंटर शोधण्यासाठी 2 अतिरिक्त पथके तयार करण्यात आली आहेत.

16:22 October 04

वडोदरामध्ये ऑटोरिक्षा आणि ट्रेलर धडकेत 7 जण ठार

वडोदरा - येथील दार्जीपुरा येथील एअरफोर्स स्टेशनजवळ ऑटोरिक्षा आणि ट्रेलर ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 7 जण ठार, 7 जखमी

16:14 October 04

7 ऑक्टोबरपर्यंत ठाकरेंचीच शिवसेना खरी असल्याचे सिद्ध करण्याची मुदत

मुबई - शिवसेनेला 7 ऑक्टोबरपर्यंत ठाकरेंचीच शिवसेना खरी असल्याचे सिद्ध करण्याची निवडणूक आयोगाची मुदत.

15:40 October 04

TRS नेते राजनाला श्रीहरी यांनी वाटल्या दारूच्या बाटल्या आणि कोंबड्या

हैदराबाद - तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव उद्या, वारंगळमध्ये राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार आहेत. त्यापूर्वी आज TRS नेते राजनाला श्रीहरी यांनी स्थानिकांना दारूच्या बाटल्या आणि कोंबड्यांचे वाटप केले. याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे.

15:36 October 04

देशमुख यांच्या जामीनाला हायकोर्टाची १३ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती

मुंबई - हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी ईडीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर अनिल देशमुख यांच्या जामीनाला हायकोर्टाने १३ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली.

15:30 October 04

भौतिकशास्त्रातील नोबेल अलेन अस्पेक्ट, जॉन एफ. क्लॉजर आणि अँटोन झेलिंगर यांनी संयुक्तपणे जाहीर

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक अलेन अस्पेक्ट, जॉन एफ. क्लॉजर आणि अँटोन झेलिंगर यांनी संयुक्तपणे जाहीर.

15:22 October 04

अनिल देशमुख यांना सीबीआयच्या न्यायालयातून जामीन मिळाल्यावरच जल्लोष - भोयर

नागपूर - अनिल देशमुख यांना एका प्रकरणात जामीन मिळाला. मात्र अद्याप सीबीआयच्या न्यायालयातून जामीन मिळणे बाकी आहे. त्यानंतरच जल्लोष केला जाईल. असे देशमुख यांचे प्रसिद्धी प्रमुख उज्वल भोयर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

15:08 October 04

अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर नागपूर शहरात जल्लोष

नागपूर - अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर शहरात जल्लोष करण्यात आला. गेले अनेक महिने देशमुख कोठडीत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली होती. आज त्यांच्यामध्ये उत्साह संचारलेला दिसून आला.

14:30 October 04

अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय निर्णय झाला. अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला. त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. 11 महिन्यांपासून अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत.

14:09 October 04

शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज

मुंबईत - मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले. शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज देण्यात येणार आहे. हा महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला.

१ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होईल. रवा, चणाडाळ, साखर व तेल प्रत्येकी एक किलो पॅकेज हे केवळ शंभर रुपयांत देण्यात येणार आहे. याचा निर्णय आज घेण्यात आला.

13:56 October 04

पुढीलवर्षी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात दसरा उत्सव - दीपक केसरकर

मुंबई - मैसूरचा दसरा जगात ओळखला जातो. दुसरा कोल्हापूरला होणारा दसरा मोठा असतो. शाहू महाराज पूजा करायचे त्यावेळेपासून या दसऱ्याला महत्व आहे. यंदापासून शाही महोत्सव साजरा केला जाणार आहे. पुढीलवर्षी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात दसरा उत्सव साजरा केला जाईल. विविध प्राधिकरण आणि अधिकाऱ्यांच्यामार्फत याचे आयोजन केले आहे. यासाठी 1 कोटी तरतूद असेल. बजेटमध्ये तशी तरतूद केली जाईल. असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले.

13:50 October 04

गुजरातच्या खेडामध्ये नवरात्रोत्सवादरम्यान दगडफेक

गुजरातच्या खेडामध्ये नवरात्रोत्सवादरम्यान दगडफेक झाली. गरबा खेळणाऱ्यांवर दगड फेकण्यात आले. यामध्ये 6 जण जखमी झाले आहेत. यामध्ये गाड्यांच्या काचाही फुटल्याची माहिती पोलिसांनी दिली.

12:54 October 04

मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अजूनही गंभीर

लखनऊ - उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. सध्या ते आयसीयूमध्ये दाखल आहेत. तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. मेदांता हॉस्पिटलच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे.

12:43 October 04

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ४ वर्षीय बालक जखमी

मुंबई - गोरेगाव परिसरात काल रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ४ वर्षीय बालक जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

12:35 October 04

लातूर जिल्ह्यात कार आणि बसचा अपघात, 5 जण ठार

लातूर - जिल्ह्यातील उदगीर चाकूर गाडीला लोहारा गावाजवळ अपघात झाला आहे. या ठिकाणी कार आणि बसचा अपघात होऊन किमान 5 जण ठार झालेत. अपघात एवढा भयानक होता की मृतांचा आकडा वाढू शकतो.

12:19 October 04

राज्याच्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला स्थान मिळावे - रामदास आठवले

नागपूर - लोकशाहीचा उगम अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात झाला. शिवसेनेचा सामना सुरू आहे, पण उद्या एकनाथ शिंदे यांचा सामना उद्या सुरू होईल असे मत केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी मांडले. एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा हा सर्वात मोठा होईल असे ते म्हणाले. राज्याच्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला स्थान मिळावे अशी मागणी केली असल्याची माहिती आठवले यांनी दिली. ते रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते.

12:15 October 04

भोसरीच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणाची PMLA कोर्टात 17 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई - पुण्यातील भोसरीच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे यांच्यावर ईडीच्या वतीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंदाकिनी या एकनाथ खडसे यांच्या पत्नी आहेत. मात्र या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात PMLA कोर्टात 17 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे.

11:55 October 04

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ

मुंबई - पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावरही १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

11:26 October 04

सीबीआय आणि मुंबई पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पैसे उकळणाऱ्या ४ जणांना अटक

सीबीआय आणि मुंबई पोलीस अधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिकाकडून पैसे उकळणाऱ्या ४ जणांना अटक करण्यात आली आहे. पाच लाख रुपये रोख आणि बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

10:33 October 04

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह वैष्णोदेवी मंदिरात घेणार दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह माता वैष्णोदेवी मंदिराच्या दर्शनासाठी सांझीचट्ट हेलिपॅडवर पोहोचले.

09:41 October 04

संघाचा विजयादशमी उत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी ५ हजार पोलिसांचे सुरक्षा कवच

विजयादशमीच्या निमित्ताने नागपूररात दोन मोठे कार्यक्रम असल्यामुळे शहर पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण येणार आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा 'अलर्ट मोड' वर कामाला लागली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

09:34 October 04

उत्तर कोरियाने डागले क्षेपणास्त्र, जपानकडून रहिवाशांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन

उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागल्याने जपानने रहिवाशांना आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे

08:54 October 04

नवरात्रोत्सवादरम्यान दगडफेक, 6 जण जखमी

काल रात्री उंढेला गावात नवरात्रोत्सव सुरू असताना आरिफ आणि जहीर नावाच्या दोन लोकांच्या टोळक्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी दगडफेक केली ज्यात ६ जण जखमी झाले आहेत.

07:52 October 04

राज्य सरकारने 12.00 वाजेपर्यंत परवानगी दिल्यामुळे नांदेडमधील दांडियाप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण

नांदेड- नवयुवक दुर्गा माता मंडळ शिवाजी नगरतर्फे दांडियासाठी खास मुंबई वरून प्रसाद महाडकर यांचा जीवनगाणीचा बँड दांडियासाठी आणल्यामुळे नांदेडकरची दांडिया खेळण्यासाठी एकच गर्दी झाली. गेल्या 2 वर्षा पासून कोरोना असल्यामुळे कुठले सण साजरे करता आले नाही. मात्र या वर्षी सगळी हौस मंडळांनी करून घेतली. राज्यसरकारने 12.00 वाजेपर्यंत परवानगी दिल्यामुळे दांडियाप्रेमीमध्ये आनंदाच वातावरण आहे.

07:49 October 04

पीएफआयच्या सदस्यांना दिल्लीत अटक

प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) चार सदस्यांना काल अटक करण्यात आली. पोलिसांनी PFI विरुद्ध UAPA कायद्यांतर्गत शाहीन बाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

07:25 October 04

नाना पटोलेंच्या चित्त्यावरील वक्तव्याचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला समाचार, म्हणाले..

नाना पटोले यांना चित्ते कुठून आणले हे माहित नाही. काहीही माहित नसताना वक्तव्ये करण्याची त्यांना सवय असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

07:22 October 04

नवरात्रीच्या नवव्या दिवशी मुंबा देवी मंदिरात गर्दी

नवरात्रीच्या नवव्या दिवशी मुंबईतील मुंबा देवी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

07:06 October 04

Maharashtra Breaking news सीबीआय आणि मुंबई पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पैसे उकळणाऱ्या ४ जणांना अटक

मुंबई दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानावर घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरेंच्या बाजूने दिल्यानंतर शिवसेनेत उत्साह संचारला आहे. तिकडे शिंदे गटसुद्धा दसरा मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत. दोन्ही गटांनी मोठी गर्दी करत आम्हीच खरी शिवसेना हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आलेले असताना आताचा दसरा मेळाव्यावरून मोठी राजकीय गणिते ठरणार आहेत. जर उद्धव ठाकरे गर्दी खेचण्यात यशस्वी झाले, तर शिंदे गटाचे अस्तित्वाला नक्कीच धक्का पोहचणार आहे पण या प्रकारात दोन्ही गटांच्या मेळाव्याला होणाऱ्या गर्दीवरुन पोलीस प्रशानाची डोके दुखी वाढली आहे.

( Maharashtra breaking news ) हे पेज दिवसभर अपडेट होत आहे.

Last Updated : Oct 4, 2022, 8:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.