ETV Bharat / city

विधानसभा २०१९ : आज अकोला, परतूर, पनवेलमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा

author img

By

Published : Oct 16, 2019, 8:34 AM IST

Updated : Oct 17, 2019, 4:47 AM IST

पंतप्रधान मोदींची शेवटची प्रचार सभा मतदानाच्या दोन दिवस आधी १८ ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे. स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. बऱ्याच ठिकाणी एकतर्फी लढती असल्याचा प्रचार केला जात आहे. तरीही देवेंद्र-नरेंद्र प्रचारावर अधिकाधिक भर देत आहेत.

मोदींच्या प्रचार सभा

मुंबई - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. बऱ्याच ठिकाणी एकतर्फी लढती असल्याचा प्रचार केला जात आहे. तरीही देवेंद्र-नरेंद्र प्रचारावर अधिकाधिक भर देत आहेत. भाजप-शिवसेना युतीला पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यातील जाहीर सभांची सुरुवात झाली आहे. पहिली सभा १३ ऑक्टोबरला उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये झाली.

आज (१६ ऑक्टोबर) अकोला, परतूर (जालना), पनवेल (नवी मुंबई) येथे मोदींच्या जाहीर सभा होतील. तर, उद्या (ता. १७) परळी (बीड), सातारा, पुणे येथे जाहीर सभा होणार आहेत. साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे तेथे विधानसभेसह लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे मोदी येथे भाजप उमेदवार उदयनराजे यांचाही प्रचार करणार आहेत. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील लढणार आहेत.

पंतप्रधान मोदींची शेवटची प्रचार सभा मतदानाच्या दोन दिवस आधी १८ ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे.

राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजप १६४ जागांवर तर, शिवसेना १२४ जागांवर लढत आहेत. १९ ऑक्टोबर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. २१ ऑक्टोबरला मतदान होईल. २४ ऑक्टोबला मतमोजणी आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्यात भाजपने १२२ आणि शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या.

Intro:Body:

विधानसभा २०१९ : आज अकोला, परतूर, पनवेलमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा

मुंबई - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. बऱ्याच ठिकाणी एकतर्फी लढतींचे चित्र दिसत असतानाही देवेंद्र-नरेंद्र प्रचारावर अधिकाधिक भर देत आहेत. भाजप-शिवसेना युतीला पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यातील जाहीर सभांची सुरुवात झाली आहे. पहिली सभा १३ ऑक्टोबरला उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये झाली.

आज (१६ ऑक्टोबर) अकोला, परतूर (जालना), पनवेल (नवी मुंबई) येथे मोदींच्या जाहीर सभा होतील. तर, उद्या (ता. १७) परळी (बीड), सातारा, पुणे येथे जाहीर सभा होणार आहेत. साताऱयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे तेथे विधानसभेसह लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे मोदी येथे भाजप उमेदवार उदयनराजे यांचाही प्रचार करणार आहेत. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील लढणार आहेत.

पंतप्रधान मोदींची शेवटची प्रचार सभा मतदानाच्या दोन दिवस आधी १८ ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे.

राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजप १६४ जागांवर तर, शिवसेना १२४ जागांवर लढत आहेत. १९ ऑक्टोबर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. २१ ऑक्टोबरला मतदान होईल. २४ ऑक्टोबला मतमोजणी आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्यात भाजपने १२२ आणि शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या.

Conclusion:
Last Updated : Oct 17, 2019, 4:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.