ETV Bharat / city

आम्ही एमपीएससीच्या आयोगाला स्वायत्तता दिली, पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही- फडणवीस

author img

By

Published : Jul 4, 2021, 4:31 PM IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वेळेवर होत नाहीत, परीक्षा झाल्या तर निकाल वेळेवर लागत नाहीत, असा भोंगळ कारभार एमपीएससी आयोगात सुरू असल्याची टीका विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

devendrafadanvis
devendrafadanvis

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वेळेवर होत नाहीत, परीक्षा झाल्या तर निकाल वेळेवर लागत नाहीत, असा भोंगळ कारभार एमपीएससी आयोगात सुरू असल्याची टीका विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यात भाजपाचे सरकार असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आम्ही स्वायत्तता दिली, मात्र आता या स्वायत्ततेचा स्वैराचार केला जातो आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला आहे.

आम्ही एमपीएससीच्या आयोगाला स्वायत्तता दिली, पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही- फडणवीस

'दोन-दोन वर्ष मुलाखती होत नसल्याने तरुणांमध्ये निराशा'

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून स्वप्नील सुनील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सध्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कार्यप्रणाली पाहता त्याचे पुनरावलोकन होणे गरजेचे आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात अनेक जागा रिक्त आहेत. मात्र त्या जागा अद्यापही भरल्या गेलेल्या नाहीत असेही त्यांनी सांगितले. राज्यातले तरूण मोठ्या आशेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत असतात. मात्र दोन-दोन वर्ष मुलाखती होत नसल्याने तरुणांमध्ये निराशा येत असल्याची त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

सरकार मोर्चेकऱ्यांच्या भावना कशा थांबवणार?
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत. राज्य सरकारकडून या मोर्चेकऱ्यांना थांबवले जात आहे. मात्र राज्य सरकार मोर्चेकऱ्यांना थांबवू शकते, त्यांच्या भावना कशा काय थांबवू शकेल? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. लोकांकडून मोर्चे काढले जातात याचा विचार राज्य सरकारने केला पाहिजे, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असताना राज्य सरकार केवळ मराठा समाजाची दिशाभूल करण्यात गुंग आहे, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

'एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका'

स्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली असून त्यात 'एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका' असे म्हटले आहे. स्वप्नीलचे शिक्षण पूर्ण झाल्यापासून तो एमपीएससीच्या परिक्षेची तयारी करीत होता. तो २०१९ च्या पूर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्यांची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली होती. त्यातील पूर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करुनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या सुसाईड नोटवरुन दिसून येत आहे.

हेही वाचा - जेवढ्या अफवा पसरवल्या जातील तेवढे आम्ही मजबूत होऊ- राऊत

हेही वाचा - विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत होणार निर्णय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.