ETV Bharat / city

Lata Mangeshkar : लतादीदींचा वयाच्या चौऱ्यांशीव्या वर्षी बत्तीस दातांपैकी फक्त...

author img

By

Published : Feb 13, 2022, 7:58 PM IST

लता दीदींचे काही दिवसांपूर्वी निधन ( Lata Mangeshkar Passes Away ) झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे ( Mumbai Marathi Grantha Sangrahalaya ) त्यांच्यावरील साहित्याच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar

मुंबई - गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे नुकतेच निधन ( Lata Mangeshkar Passes Away ) झाले. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया'त ( Mumbai Marathi Grantha Sangrahalaya ) त्यांच्यावरील साहित्याच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगेशकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात लेखन झाले आहे. त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण व निवडक साहित्य या प्रदर्शनात लावण्यात आले आहे.

स्वर हरपला तरी लतादीदी अनेक रुपात अजरामर

मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या, दादर पूर्व येथील संदर्भ विभागात मंगेशकर यांनी स्वतः लिहिलेल 'माझं गाणं' हा २००१ साली प्रसिद्ध झालेला लेख, १९८९ साली 'गावकरी दिवाळी अंका'त छापून आलेला त्यांचा उत्तम गायक होण्यासाठी स्वरसाधना, रियाज आणि चांगल्या मार्गदर्शनाची नितांत गरज हा लेख प्रदर्शनात लावण्यात आला आहे. 'मुक्काम कोल्हापूर' हा मंगेशकर यांच्यावर आधारित लेख १९८८ साली 'मौज दिवाळी अंका'त प्रसिद्ध झाला होता. त्याचे शब्दांकन कवयित्री शांता शेळके यांनी केले होते. शिरीष पै यांचा 'मंगेशकर एक मंदिर' हा लेख १९८७ साली 'भ्रमंती दिवाळी अंका'त तर १९८४ साली शिरीष कणेकर यांनी 'किस्त्रीम दिवाळी अंका' त 'सुरांची चैतन्यफुले फुलवणारी लता' हा लेख लिहिला होता.

कोल्हापूर विद्यापीठाकडून १९७८ साली लता दीदींना पहिली डी. लिटची पदवी प्रदान करण्यात आली होती. त्यादरम्यान असणारे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. भा. श. भणगे यांची मुलाखत सुद्धा इथे बघायला भेटते. लता दीदींचे फुले वेचिता हे पुस्तक अशी कितीतरी ग्रंथ संपदा इथे पहायला भेटते. लतादीदींवरील विविध मासिके, नियतकालिके, वर्तमानपत्रे आणि पुस्तकांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख बघण्याची संधी वाचकांना इथे मिळत आहे. वाचक वर्गही याला भरभरून प्रतिसाद देत आहे.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय सदस्यांची प्रतिक्रिया

वयाच्या चौऱ्यांशीव्या वर्षीसुद्धा बत्तीस दातांपैकी...

'एका सेलिब्रिटी डेंटिस्टची बत्तिशी', हे पुस्तक डेंटिस्ट डॉक्टर संदेश मयेकर यांनी लिहिले आहे. या पुस्तकात लता दीदी म्हणतात की, डॉ. मयेकरांची माझी १९८० साली भेट झाली. डॉ. पी. एन. भन्साली या वरिष्ठ दंतवैद्यांकडे त्या वेळेस ते शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होते. गेल्या दहा वर्षांपासून मी त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी अधूनमधून जात असते. आता चौऱ्यांशीव्या वर्षीसुद्धा बत्तीस दातांपैकी फक्त एकच दात मी गमावला आहे हे मी अभिमानाने सांगू शकते. मी माझ्या दातांची खूप काळजी घेत असते. एक गायिका म्हणून व्यावसायिक दृष्टीने काळजी घेते असे नव्हे, तर निरोगी दात हे संपूर्ण शरीर निरोगी असण्याची पहिली खूण आहे, म्हणूनही त्यांची काळजी घेते. दात खराब असणे हे बऱ्याचशा गंभीर समस्यांचे पहिले लक्षण आणि कारण असू शकते. दातांविषयी अगदी किरकोळ तक्रार असली तरी मी डॉ. मयेकरांकडे धाव घेते. या वयात इतरांच्या तोंडात एकही दात शिल्लक नसतो, पण माझे असली दात शाबूत असण्याचं मात्र हेच रहस्य आहे, अशी आठवण त्या पुस्तकात सांगण्यात आली आहे.

हेही वाचा - मुंबई महापालिका प्रभाग पुनर्रचनेविरोधात ३४५ हरकती, उद्या शेवटचा दिवस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.