ETV Bharat / city

Coastal Road Project : मुंबईत कोस्टल रोडमार्गावरील कोळी बांधवांना मिळणार 'विमा कवच'

author img

By

Published : Sep 23, 2022, 5:34 PM IST

मुंबई मनपाचा महत्वकांक्षी असलेल्या कोस्टल रोड प्रकल्प (Coastal Road Project Mumbai) तयार केला जात असून या प्रकल्पाचे काम ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. कोळी बांधवांना नुकसान भरपाईसाठी विमा कवच काढून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अभियंत्याकडून देण्यात (Koli brothers will get insurance cover) आली.

Coastal Road Project Mumbai
कोस्टल रोड प्रकल्प मुंबई

मुंबई : मुंबईत वाहतूक कोंडी नवी नाही. वाहनांचे कर्णकर्कश आवाज, तासनतास वाहतूक कोंडीचा मुंबईकरांना सामाना करावा लागतो. ही कोंडी फोडण्यासाठी मुंबई मनपाचा महत्वकांक्षी असलेल्या कोस्टल रोड प्रकल्प (Coastal Road Project Mumbai) तयार केला जात असून या प्रकल्पाचे काम ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम युध्दपातळीवर पुर्ण करण्यासाठी वेग आला आहे. तसेच कोळी बांधवांच्या रोजीरोटीवर या महामार्गाचा परिणाम होऊ नये, यासाठी वरळीच्या समुद्रांत सुमारे ६० मीटर अंतरावर एकल खांब उभारले जाणार आहेत. कोळी बांधवांना नुकसान भरपाईसाठी विमा कवच काढून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अभियंत्याकडून देण्यात (Koli brothers will get insurance cover) आली.


मुंबईच्या निळ्याशार समुद्राला लागून कोस्टल रोड प्रकल्प उभारण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारमार्फत समुद्रात भराव टाकून बनवला जाणारा भारतातील पहिला प्रकल्प हाती घेतला आहे. २००६ मध्ये कॉम्प्रेसिव्ह ट्राफिक स्टडी अहवालात अंतर्भाव असणारा तसेच संयुक्त तांत्रिक समितीने अभ्यास सिंगापूर, नेदरलॅंड आणि साऊथ कोरीया या देशातील समुद्रांतील भरावाचा अभ्यास करून विस्तृत प्रकल्प अहवालसाठी शिफारस केलेला असा हा प्रकल्प आहे. तसेच भारतातील तज्ज्ञ, अनुभवी अभ्यासकांचे मार्गदर्शन घेऊन विस्तृत प्रकल्प अहवाल तयार २०१६ मध्ये तयार करण्यात आला. प्रत्यक्ष कामाला सुरुवात ऑक्टोबर, २०१८ मध्ये केली. परंतु अनेक विघ्न या मार्गात (Koli brothers on coastal road) आले.

२०१९ मध्ये या प्रकल्पाविरोधात न्यायालयात गेले. मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती दिली. ही स्थगिती उठवण्यास महापालिकेला नऊ महिने लागले. अखेर डिसेंबर, २०१९ मध्ये न्यायालयाने स्थगिती उठवत, प्रकल्पच्या कामाला हिरवा कंदील दिला. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. गेल्या दोन वर्षापूर्वी कोरोना महामारीचे संकट जगावर आले. महाराष्ट्र देखील या विळख्यात सापडला. तरीही न डगमगता मुंबई महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी वर्गाने अनोख्या यंत्रणांच्या सहाय्याने ऊन, वारा, पाऊस झेलत, गेल्या दोन वर्षांच्या कोविड महामारीत कोस्टल रोडचे काम आज ६२ टक्के काम पूर्ण केले आहे. उर्वरित काम २०२३ अखेर पूर्णात्वास आणण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट्ये (Coastal Road Project) आहे.


मावळा खणतो बोगदा -कोस्टर रोडसाठी दोन महाबोगदे खणले जाणार आहेत. या प्रकल्पात, टी. बी. एम.मशीन हे संयंत्र महत्वाची कामगिरी बजावणार आहे. टीबीएम मशीनला मावळा असे नाव दिले असून ते देशातील सर्वात मोठे मशीन आहे. महानगरांमधील रस्ते बोगद्यांमध्ये साकार्डो वायुव्हिजन प्रणाली अशा प्रकारची यंत्रणा भारतात पहिल्यांदाच बसवली जाणार आहे. मावळा मशीनचे वजन २३०० टन असून सुमारे आठ जंबो जेटच्या वजनाची आहे. तिचा व्यास १२.१९ इतका आहे. बोगदा खोदताना कोणत्याही अचडणींचा सामना करावा लागणार नाही, अशी व्यवस्था यात आहे .

२.०७२ किलोमीटरचे बोगदे - प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या 'छोटा चौपाटीपर्यंत बोगदे आहेत. मलबार हिल' च्या खालून हा बोगदा जाईल. सुमारे जमिनी खाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर हे बोगदे असतील. या दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७२ किलोमीटर इतकी असेल. शामलदास गांधी मार्गावरील उड्डाणपूल ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी लांबीचा हा 'सागरी किनारा मार्ग' असणार आहे. अरबी समुद्रामध्ये तब्बल १७५ एकर जमिनीवर भराव टाकला आहे . या मार्गमध्ये समुद्राखालून जाणारे १४०० मीटरचे बोगदे असणार आहेत. समुद्रात भराव टाकून रोड बनवणे खूप जिकरीचे आणि जोखमीचे काम (coastal road) आहे.



बोगद्याच्या बांधकामाची वैशिष्ट्ये व आयुर्मान -भूगर्भातील व वेगवेगळ्या ऋतुंमधील वातावरणातील बदलांचा विचार करुन बोगद्याचे बांधकाम केले जाईल. टनेल बोअरिंग मशिनद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बांधण्यात येणारे हे बोगदे भूकंपरोधक असतील. त्यातील भिंती या अतिउच्च तापमानाला सहन करतील, अशा स्वरुपाच्या असणार आहेत. आग किंवा आपत्कालीन स्थितीत येथील तपमान सहन करण्याची क्षमता या भिंतीत असेल. बोगद्यांमध्ये दोन्ही बाजूला वाहनांच्या सुरक्षेसाठी 'क्रश बॅरियर' तयार केले जाणार आहेत. या बोगद्यांचे आयुर्मान १२० वर्षांचे असणार आहे.



दोन्ही बोगद्याला जोडणारे 'छेद बोगदे' (क्रॉस टनेल) - आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास दोन बोगदे असतील. दोन्ही बोगद्यापैकी एका बोगद्यातून दुस-या बोगद्यात सहजपणे जाता यावे, यासाठी दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकूण ११ 'छेद-बोगदे' तयार केले जाणार आहेत. प्रत्येक ३०० मीटर अंतरावर असणा-या या छेद बोगद्यांची लांबी ही साधारपणे ११ मीटर ते १५ मीटर असले. हे छेद-बोगदे केवळ आपत्कालिन परिस्थिती दरम्यान उपयोगात आणले जातील. या ११ छेद बोगद्यांपैकी ५ छेद बोगदे हे वाहनांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी; तर उर्वरित ६ बोगदे हे प्रवाशाना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी असतील.



अत्याधुनिक 'सकार्डो नोझल' यंत्रणा -'सकार्डो नोझल' या अत्याधुनिक यंत्रणे अंतर्गत दोन्ही बोगद्यांच्या दोन्ही मुखाजवळ वैशिष्ट्यपूर्ण यंत्रे बसवली जाणार आहे. या यंत्रांद्वारे बोगद्याच्या एका बाजूने हवा अत्यंत तीव्रतेने आतमध्ये ढकलली जाते व बोगद्याच्या दुस-या बाजूने ती बाहेर खेचलीही जाते. बोगद्याची वाहतूक ज्या दिशेने जात असेल, त्याच दिशेने ही हवा आत ढकलली जाते व दुस-या बाजूने बाहेर खेचली जाते. ज्यामुळे बोगद्यातील हवा खेळती राहण्यासोबत वाहनांमधून सोडला जाणार धूर देखील बोगद्यातून लगेच बाहेर पडतो व प्रदूषण उत्सर्जित होऊन बोगद्यातील वातावरण चांगले राहण्यास मदत होत. तसेच एखाद्या गाडीला आग लागल्यास त्यातून उत्पन्न होणारा धूर देखील या यंत्रणेद्वारे अत्यंत वेगाने बाहेर खेचला जातो. ज्यामुळे धूर बोगद्यात साठत नाही व आपत्कालीन परिस्थितीचे नियोजन करणे सुलभ होते. अशा प्रकारची यंत्रणा भारतात प्रथमच या प्रकल्पात वापरली जाणार आहे.


अग्निशमन यंत्रणा - आगीची संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बोगद्यांमध्ये स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा अव्याहतपणे कार्यरत राहणार आहे. याच बरोबर 'एबीसी' या प्रकारातील फायर एक्स्टींग्विशर, फायर हायड्रंट, फायर होज रील, फीक्स फायर सिस्टम इत्यादी बाबी देखील बोगद्यांमध्ये असणार आहेत. संभाव्य आपत्कालीन प्रसंगी या सर्व बाबींसाठी मुबलक प्रमाणात व उच्च दाबाने पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बोगद्यांमध्ये अग्निशमन यंत्रणेला जोडलेली व नियमितपणे कार्यरत राहणारी स्वतंत्र जलवाहिनी देखील असणार आहे.


बोगद्याची लांबी, परीघ, उंची - प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यांतर्गत बांधण्यात येणा-या दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी ४.०६ किलोमीटर असेल. तसेच बोगद्यांचा परीघ हा ११ मीटरचा, तर बोगद्यातील रस्त्याच्या पृष्ठभागापासून बोगद्याची उंची ही साधारणपणे ६ मीटर असणार आहे. जलदगतीने वाहतूक होऊन इंधनाची मोठी बचत होईल. शिवाय, वेळ देखील वाचणार आहे.



बोगद्यातील रस्ते - अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणा-या दोन्ही बोगद्यातील रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे असणार आहेत. प्रत्येक बोगद्यामध्ये ३.३ मीटर लांबीच्या दोन मार्गिका या नियमीत वाहतूकीसाठी असतील, तर २.६७ मीटर लांबीची मार्गिका ही आपत्कालिन वाहतुकीसाठी आरक्षित असेल. प्रत्येक बोगद्यातील रस्ता रेषेतील एकूण रुंदी ही सुमारे ९.२७ मीटर असणार आहे. या व्यतिरिक्त विविध उपयोगितांच्या वाहिन्या, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पर्जन्यजल वाहिन्या आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूस ०.६ मीटरचे आपत्कालिन पदपथ देखील असणार आहे.



बोगद्यातील प्रकाशव्यवस्था - बोगद्यांमध्ये पुरेशा प्रमाणात उजेड असावा, यासाठी जागोजागी विद्युत दिव्यांची सोय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहन चालकांना बोगद्यातील भिंतींचा निश्चित अंदाज यावा, यासाठी वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीने बोगद्यातील भिंतींमध्ये सुरक्षा दिवे देखील बसविले जाणार आहेत. विद्युत वापर खर्चात बचत होण्यासह परिरक्षण व देखभाल खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने बोगद्यातील सर्व दिवे हे 'एल.ई.डी.' प्रकारचे दिवे असणार आहेत. तसेच बोगद्यातील काँक्रीटच्या आच्छादनावर परावर्तित रंग देण्यात येणार आहे. बोगद्यातील उजेडाचे प्रमाण वाढण्यास यामुळे मदत होईल.


मार्गदर्शक चिन्हे व सूचना फलक - बोगद्यातून आवागमन करणाऱ्यांना सुलभ व्हावे, यासाठी बोगद्यांमध्ये जागोजागी आवश्यक ती मार्गदर्शक चिन्हे व सूचना फलक लावले जाणार आहेत. काही सूचना फलक हे संगणकीय 'डिजीटल' स्वरुपाचे व बदलत्या संदेशांचे असतील. तर स्थायी स्वरुपाचे सूचना फलक हे अंधारातही चमकतील, अशा वैशिष्ट्यपूर्ण रंगातील असणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील त्यावरील मजकूर वाचता येणार आहे.


सीसीटिव्ही व ध्वनीक्षेपण व्यवस्था - वाहतुक सुरक्षेच्या व मानवी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बोगद्यांमध्ये जागोजागी सीसीटिव्ही लावले जाणार आहे. त्याद्वारे प्राप्त होणा-या चित्रणाचे नियमितपणे अवलोकन केले जाणार आहे. त्याचबरोबर आपत्कालिन परिस्थितीत किंवा अन्य आवश्यक प्रसंगी संवाद साधण्यासाठी बोगद्यांमध्ये ध्वनीक्षेपण व्यवस्था देखील असणार आहे. या दोन्ही बाबींसाठी मध्यवर्ती समन्वय यंत्रणा असणार आहे.



कोळी बांधवांना विमा कवच -कोस्टल रोडमुळे कोळी बांधवांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी मुंबई महापालिकेने घेतली आहे. समुद्रात ६० मीटरच्या अंतरावर खांब उभारले जातील. एकल खांब अशी संकल्पना यावेळी वापरली जाणार आहे. तसेच खांबाना बोटी धडकून बोटींचे नुकसान होऊ नये, विशेष दर्जाचे रबर लावण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक कोळी बांधवांना मनुष्य आणि बोटींना विमा कवच काढून दिले जाणार आहे. मासेमारीसाठी जेटी बांधून देण्याबाबतही प्रशासनाने तयारी दर्शवली आहे. संबंधित प्रस्ताव कोळी बांधवांना आणि त्यांच्या संघटनांकडे पाठवला आहे. अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही.



१० तरुण अभियंत्यांची फौज - कोस्टल रोडच्या बांधणीसाठी महापालिकेने कंबर कसली आहे. मनपाच्या प्रमुख अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली १० तरुण अभियंते कामाला लागले आहेत. भारतातील समुद्रात उभारला जाणारा हा पहिला रस्ता असल्याने देशाने दखल घ्यावी, अशी कामगिरी करण्यावर तरुण अभियंत्यांनी जोर दिला आहे. तसेच कर्मचारी वर्गाने रात्रंदिवस हा मार्ग पूर्ण करण्यासाठी झटला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.