ETV Bharat / city

कंगना रणौत-जावेद अख्तर वाद पुन्हा कोर्टात!

author img

By

Published : Jul 3, 2021, 3:54 PM IST

बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत आणि वाद यांचे नाते अतुट आहे. कंगना मागच्या काही दिवसांपासून कोणत्यांना कोणत्या वादात उडी घेवून चर्चेत राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. सध्या पुन्हा एकदा कंगनाचे नाव चर्चेत आले आहे. ते म्हणजे पासपोर्ट नुतनीकरणाचे प्रकरण आहे.

कंगना रणौत-जावेद अख्तर वाद पुन्हा कोर्टात!
कंगना रणौत-जावेद अख्तर वाद पुन्हा कोर्टात!

मुंबई - बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत आणि वाद यांचे नाते अतुट आहे. कंगना काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या वादात उडी घेवून चर्चेत राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. सध्या पुन्हा एकदा कंगनाचे नाव चर्चेत आले आहे. ते म्हणजे पासपोर्ट नुतनीकरणाचे प्रकरण आहे. पासपोर्ट नुतनीकरणादरम्यान कंगनाने तथ्य लपवले असल्याचा आरोप बॉलिवूडचे प्रसिद्ध रायटर जावेद अख्तर यांनी केला आहे. त्या अनुषंगाने जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. जावेद अख्तर यांच्या याचिकेत कंगना हिने कोर्टाला फसवले असल्याचा आशय लिहला असल्याचे कळते.

काय आहे प्रकरण?
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात कंगना रणौत हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांच्या विरोधात काही अक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या. त्यानंतर जावेद अख्तर यांनी थेट कोर्टाचे दार ठोठावले आणि कंगना विरोधात मानहानीचा दावा केला. याप्रकरणात मार्च महिन्यात कंगनाविरोधात वारंट काढले गेले. मात्र 25 मार्चला कंगनाला जामीन मिळाला. ते प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ठ आहे.

'कंगना रणौतचा दावा खोटा'

28 जून रोजी कंगनाच्या पासपोर्ट नुतनीकरणाच्या सुनावणीदरम्यान पासपोर्ट अथोरिटीने विचारणा केली की, जर अभिनेत्रीने सांगितले की, 'माझ्या विरोधात कोणतीही क्रिमिनल केस पेंडिग नाही तर त्यांना लवकर पासपोर्ट रिन्यू करुन मिळेल'' यावर कंगनाच्या वकीलांनी असे सांगितले की,''कंगनाच्या विरोधात कोणतीही क्रिमिनल केस पेंडिग नाही''. यावर जावेद अख्तर यांनी हरकत नोंदवत कंगना खोटं बोलत असल्याचा दावा करत याचिका दाखल केली. जावेद अख्तर यांनी याचिकेत असे म्हटले की, कोर्टाने कंगनाला विचारले की तुमच्या विरोधात काही क्रिमिनल केले आहेत का? तर कंगनाच्या वकीलांकडून स्पष्ट मनाई करण्यात आली. मात्र दोन केस फाईल आहेत असे कोर्टाला सांगण्यात आले. मात्र त्या दोन्ही केसमध्ये मी मानहानीचा दावा केला आहे याचा उल्लेख नाही. मानहानीचा दावा केलेली केस कोर्टात पेंडिग आहे.

हेही वाचा - Aamir Kiran Divorce : १५ वर्षांचे सहजीवन संपले, आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.