ETV Bharat / city

प्रवाशांच्या सोयीसाठी जनशताब्दी एक्स्प्रेस 14 फेब्रुवारीपासून धावणार दररोज!

author img

By

Published : Feb 12, 2021, 8:02 PM IST

दैनिक जनशताब्दी एक्स्प्रेस 14 फेब्रुवारी 2021पासून दररोज चालण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई ते जालना प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Janshatabdi
Janshatabdi

मुंबई - प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुविधेसाठी दैनिक जनशताब्दी एक्स्प्रेस 14 फेब्रुवारी 2021पासून दररोज चालण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई ते जालना प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेसचा वेळ

गाडी क्रमांक 02271 जनशताब्दी विशेष एक्स्प्रेस 14 फेब्रुवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून दररोज दुपारी 12 वाजून 10 मिनिटाने सुटेल. तर, जालना येथे त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी पोहोचले. तर गाडी क्रमांक 02272 जनशताब्दी विशेष एक्स्प्रेस रविवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत जालना येथून दररोज सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. तर, सीएसटी येथे त्या दिवशी दुपारी 4 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल.

असे असणार थांबे

जनशताब्दी एक्स्प्रेस ही विशेष गाडी येताना आणि जाताना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड आणि औरंगाबाद थांबे देण्यात येणार आहेत. त्यामुळे थांबे देण्यात आलेल्या रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. तसेच जनशताब्दी एक्स्प्रेस या गाडीची संरचना 3 वातानुकूलिल डबे आणि 17 द्वितीय श्रेणीचे डबे असणार आहेत.

मध्य रेल्वेकडून प्रवाशांना आवाहन

जनशताब्दी एक्स्प्रेस आरक्षण संगणकीकृत आरक्षण केंद्र किंवा www.irctc.com.in या संकेतस्थळावर सुरू आहे. या गाडीतून आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. प्रवाशांनी बोर्डिंग प्रवासादरम्यान आणि इच्छितस्थळी पोहोचताना कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.