ETV Bharat / city

Sharad Pawar On Mva : अडीच वर्षात मआविचा प्रयोग फसला हे म्हणणे राजकीय अज्ञान! - पवार

author img

By

Published : Jun 24, 2022, 7:55 AM IST

बंडखोरी होणे, एखादे सरकार अस्थिर होणे अशी परिस्थिती याआधीही महाराष्ट्राने पाहिलेली आहे. ही काही पहिलीच वेळ नाही. ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार ( Thackeray government ) विधानसभेत ( Legislative Assembly ) बहुमत सिद्ध करेल. त्यामुळे अडीच वर्षात हा माविआचा प्रयोग फसला असे म्हणणे म्हणजे राजकीय अज्ञान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

मुंबई - अशी परिस्थिती महाराष्ट्राने यापूर्वी पाहिली आहे त्यामुळे ठाकरे सरकार ( Thackeray government ) यावर मात करून विधानसभेत ( Legislative Assembly ) बहुमत सिद्ध करेल व ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरू आहे हे संबंध देशाला कळेल असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने उत्तम कारभार केला. शिवाय जनतेसाठी चांगले निर्णयही घेतले. कोरोना या राष्ट्रीय संकटात आरोग्य विभागाने परिस्थिती चांगली हाताळली त्यामुळे अडीच वर्षात हा प्रयोग फसला हे म्हणणं म्हणजे राजकीय अज्ञान आहे असा टोलाही शरद पवार यांनी यावेळी लगावला. ज्यावेळी आमदार राज्याबाहेर गेले ते इथे आल्यानंतर ज्यापध्दतीने त्यांना नेण्यात आले ही वस्तुस्थिती सांगतील व शिवसेनेसोबत भूमिका स्पष्ट करतील व बहुमत कुणाचे आहे हे सिद्ध होईल असेही शरद पवार यांनी सांगितले.

बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील - शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावेच लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंतर मला वाटत नाही की त्यांना आसाम आणि गुजरातचे नेते इथे येऊन मार्गदर्शन करतील. तसेच तिथे गेलेल्या आमदारांनी घेतलेला निकाल पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघात देखील त्याची प्रतिक्रिया उमटेल, त्यामुळेच आपल्या मतदारसंघातील लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत असेही शरद पवार यांनी सांगितले.

हेही वाचा - Nana Patole on Shivsena : भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देऊ - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.