ETV Bharat / city

Free Tea Offer to Womens : वर्किंग महिलांसाठी मुंबईत मोफत चहा; महिला दिनानिमित्ताने अनोखा उपक्रम

author img

By

Published : Mar 8, 2022, 7:29 PM IST

Updated : Mar 8, 2022, 10:06 PM IST

महिंलांप्रती सद्भावना व्यक्त करताना मनोज टी स्टॉलतर्फे (Manoj Tea Stall) या परिसरात काम करणाऱ्या शेकडो महिलांना संपूर्ण दिवस मोफत चहाचा आस्वाद (Free Tea Offer) देण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक महिन्याचा १ तारखेला एका तासासाठी सर्वांना निःशुल्क चहा विक्री या टी स्टॉलकडून देण्यात येतो.

womens day
महिलांसाठी मोफत चहा

मुंबई - जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) जगभर महिलांप्रती आदर व्यक्त करण्यात येतो. तसेच विविध संस्था आणि संघटनांकडून मंगळवारी विविध उपक्रमांची मेजवानी सुरू आहे. अशा परिस्थितीत बॅलार्ड इस्टेट परिसरात वर्किंग वुमनसाठी एका चहाच्या टपरीवर अनोखा उपक्रम राबवला जात आहे. महिंलांप्रती सद्भावना व्यक्त करताना मनोज टी स्टॉलतर्फे (Manoj Tea Stall) या परिसरात काम करणाऱ्या शेकडो महिलांना संपूर्ण दिवस मोफत चहाचा आस्वाद (Free Tea Offer) देण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक महिन्याचा १ तारखेला एका तासासाठी सर्वांना निःशुल्क चहा विक्री या टी स्टॉलकडून देण्यात येतो.-

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

तब्बल शंभरहून अधिक महिलांनी घेतला आस्वाद -

गेल्या १५ वर्षांपासून मनोज सिंह ठाकूर हा तरुण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरात चहा व्यवसाय करतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महिलांविषयी सद्भावना व्यक्त करण्यासाठी आणि समाजाचे देणे लागतो, या भावनेतून त्यांनी महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांसाठी खास मोफत चहा ठेवला होता. या उपक्रमाला लहान मुलींपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत तुफान प्रतिसाद मिळाला आहे. आज सकाळपासून ते सायंकाळपर्यत तब्बल शंभरहून अधिक महिलांनी मोफत चहाचा आस्वाद घेतला आहे. प्रत्येक महिला आणि मुलींपर्यंत चहा मोफत देणार असल्याचे पोस्टर मनोज टी सेंटरवर लावण्यात आले होते. याबाबत मनोज टी सेंटरचे मालक मनोज सिंह ठाकूर यांनी सांगितले की,माझ्या सर्व महिला ग्राहकांना आणि इतर महिलांविषयी सद्भावना व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे.

f
मोफत चहासाठीचे बॅनर

येथे मिळतो एका तासाठी मोफत चहा-

f
मोफत चहासाठीचे बॅनर

मनोज सिंह ठाकूर यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून महिला दिनानिमित्ताने हा उपक्रम सुरु केला आहे. याशिवाय प्रत्येक महिन्याचा १ तारखेला एका तासासाठी सर्वांना निःशुल्क चहा विक्री करतो. सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यत असा एक तास हा उपक्रम सुरु असतो. या उपक्रमांतर्गत कुल्लड चहा, गवती चहा आणि गुळाची कॉफी असे अन्य पर्यायही उपलब्ध करून देत आहोत. या एका तासामध्ये जवळपास २०० ते ३०० ग्राहक मोफत चहाचा आस्वाद घेतात. प्रत्येक महिन्याला या उपक्रमांसाठी जवळपास आम्हाला ३ हजार ते ४ हजार रुपये खर्च येतो. मात्र, उपक्रमामुळे अनेक नागरिक आमचे ग्राहक झाले आहेत, अशी माहिती मनोज सिंह ठाकूर यांनी दिली आहे.

Last Updated : Mar 8, 2022, 10:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.