ETV Bharat / city

PIL Against Sanjay Raut : बार असोसिएशनची खा.संजय राऊत यांच्याविरोधात अवमान याचिका

author img

By

Published : Apr 20, 2022, 7:22 AM IST

इंडियन बार असोसिएशनने (Indian Bar Association) शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्याविरोधात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर अवमानकारक आरोप केल्या बद्दल (Contempt charges against judges) जनहित अवमान याचिका (contempt petition cum PIL ) दाखल केली आहे

MP Sanjay Raut
खा. संजय राऊत

मुंबई: इंडियन बार असोसिएशनने (Indian Bar Association) शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) आणि इतरांविरुद्ध "उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर खोटे, निंदनीय आणि अवमानकारक आरोप (Contempt charges against judges) केल्याबद्दल अवमान आणि जनहित याचिका (contempt petition cum PIL ) दाखल केली आहे." याचिकाकर्त्यानी या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील प्रतिवादी केले आहे.

राऊतांनी उपस्थित केलेले प्रश्न : इथे एका विशिष्ट पक्षाला अटकेपासून संरक्षण मिळते. मग आमची शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, किंवा काँग्रेस आमच्या पक्षाच्या लोकांना संरक्षण का मिळत नाही? त्यांचे जामीन ( Sanjay Raut on judiciary ) का मंजूर होत नाहीत? त्यांना अटकेपासून संरक्षण हे न्यायालय का देत नाही? ( Sanjay Raut allegations on judiciary ) कोणताही गैरव्यवहार हा गैरव्यवहार असतो, घोटाळा हा घोटाळा. मग तो अठ्ठावन्न रुपयाचा असो अथवा 58 कोटीचा, इथे दुजाभाव का? असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.

न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीचे लोक -अनेक महिने बघतोय एका विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच आणि त्यांच्या समर्थकांना अटकेपासून संरक्षण मिळत आहे. त्यांचे जामीन मंजूर होतात. त्यामुळे, मी न्यायालयाचा पूर्ण आदर ठेवून हे सांगतोय या न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचा मोठा भरणा आहे आणि हेच लोक यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

आम्हाला संरक्षण का नाही ? - इथे एका विशिष्ट पक्षाला अटकेपासून संरक्षण मिळते. मग आमची शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आमच्या पक्षाच्या लोकांना संरक्षण का मिळत नाही? त्यांचे जामीन का मंजूर होत नाहीत? त्यांना अटकेपासून संरक्षण हे न्यायालय का देत नाही?

  • Indian Bar Association has filed contempt petition cum PIL against Shiv Sena MP Sanjay Raut &others for levelling "false, scandalous & contemptuous allegations against judges of High Court."Petitioner has also made Maharashtra CM Uddhav Thackeray, HM Dilip Walse Patil respondents

    — ANI (@ANI) April 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.