ETV Bharat / city

India Corona Update : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरुच, देशात २४ तासांत आढळले २१८८० रुग्ण

author img

By

Published : Jul 22, 2022, 10:00 AM IST

मुंबईत गेल्या २४ तासात १० हजार ०५८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २७३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर देशात कोरोनाचे १,४९,४८२ रुग्ण आहेत.

India corona update
भारत कोरोना अपडेट

मुंबई- देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ ( India corona update ) झाली आहे. गेल्या २४ तासांत २१,८८० रुग्ण आढळले ( India corona today news ) आहेत. तर २४ तासांत ६० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू ( corona patients death ) झाला आहे.

देशात कोरोनाचे १,४९,४८२ रुग्ण आहेत. मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज २७३ रुग्णांची तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २४४ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


२७३ नवे रुग्ण - मुंबईत गेल्या २४ तासात १० हजार ०५८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २७३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज १ मृत्यूंची नोंद झाली आहे. ३३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २२ हजार १०९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ५३६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ७१३ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २७१३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२६ टक्के इतका आहे.

आरोग्य यंत्रणा सतर्क-देशभरात गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार ( corona virus ) आहे. हा प्रसार अद्यापही सुरू असताना मंकीपॉक्स ( Monkeypox ) या आजाराने ६० हून अधिक देशात प्रवेश केला आहे. यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क ( Government and health systems alert ) झाली आहे. देशात आढळून आलेले दोन्ही रुग्ण परदेश प्रवास करून आले असल्याने परदेश प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांवरती ( foreign travelers ) विशेष लक्ष दिले जात आहे. त्यांची स्क्रीनिंग केली जात आहे.

कोरोना आणि मंकीपॉक्समध्ये आहेत हे फरक - कोरोना आजाराची या मंकीपॉक्स च विषाणू म्हणून साम्य असल तरी कोरोनाचा विषाणू वटवागूळ पासून ( bats ) माणसांमध्ये आलेला आहे. आणि हा मंकीपॉक्स देखील प्राण्यांमधून माणसांमध्ये आलेला आजार आहे. या दोघांच्याही लक्षणांमध्ये मोठं फरक असून कोरोनामध्ये सर्दी, खोकला, ताप येतो आणि मंकीपॉक्स या आजारामध्ये ज्या वेळेस याचा विषाणू शरीरात प्रवेश करतो. तेव्हा तीन दिवसांनी ताप येतो.आणि सर्दी खोकला ताप हे येतच पण त्या माणसाच्या शरीरावर एक प्रकारे पुरळ उठते आणि ही पुरळ वाढत जाते आणि त्याची फोड होते.त्यात पाणी भरल जातं.आणि नंतर त्यात पू भरल्यासारखी पिवळसर होतात.आणि मग याच्या खपल्या बनतात आणि ते पुढे झडतात.हे सर्व व्हायला किमान 12 ते 15 दिवस लागतात.

हेही वाचा-Difference Between Corona And Monkeypox : कोरोना आणि मंकीपॉक्स आजारांमधील फरक काय? वाचा...

हेही वाचा-Nashik School Wari : 400 विद्यार्थी, शिक्षकांचा वारी सोहळा; शाळेला पंढरपूरची अनुभूती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.