ETV Bharat / city

IIT Mumbai Advises Railway : रेल्वे रूळांवर पाणी साचू नये म्हणून भूमिगत तलाव बांधा, आयआयटी मुंबईने दिला रेल्वेला सल्ला

author img

By

Published : Dec 16, 2021, 10:29 AM IST

दरवर्षी पावसाळ्यात मध्य रेल्वे मार्गावरील ( Central Railway Route ) रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प ( Water Logging On Railway Tracks ) होते. त्यामुळे, मुंबईकरांची चांगलीच गैरसोय होते. मात्र, आता पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नयेत म्हणून, पाणी साचणाऱ्या रेल्वे स्थानकादरम्यान मध्य रेल्वेकडून अनेक उपायोजना ( Pre Monsoon Work Railway ) करण्यात येत आहेत. मात्र, यासाठी मध्य रेल्वेने आयआयटी मुंबईकडे धाव घेतली होती. आयआयटी मुंबईने मध्य आणि पश्चिम रेल्वेला ( Central Western Railway ) भूमिगत तलाव बांधण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार पाणी साचणाऱ्या रेल्वे स्थानकादरम्यान भूमिगत तलावाची बांधणी करण्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आलेला आहे.

रेल्वे रूळांवर पाणी
रेल्वे रूळांवर पाणी

मुंबई- मध्य- पश्चिम रेल्वेकडून ( Central Western Railway ) पावसाळ्यापूर्वी लोकल सेवा ठप्प होऊ नये म्हणून, मान्सूनपूर्व कामे ( Pre Monsoon Work Railway ) युद्धपातळीवर करण्यात येतात. मात्र, तरी सुद्धा रेल्वे रुळावर पाणी साचण्याच्या घटना ( Water Logging On Railway Tracks ) घडतात. परिणामी लोकल सेवा ठप्प होते. ही समस्या कायमची दूर व्हावी याकरिता आतापर्यंत रेल्वे आणि महापालिकेकडून असंख्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात परिस्थितीत काही सुधार होताना दिसून येत नाही. यंदा तर पहिल्याच पावसात रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मुंबईची उपनगरीय लोकल सेवा ( Mumbai Suburban Local Service ) तब्बल साडेनऊ तास बंद होती. त्यामुळे, तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल ( Railway Minister Piyush Goyal ) यांनी रेल्वेला मान्सूनचा पाऊस हाताळण्यासाठी तांत्रिक आणि नागरी कामाच्या उपक्रमांच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी, आयआयटी मुंबई सारख्या संस्थांसोबत भागीदारी ( Partnership With IIT Mumbai ) करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर मध्य, पश्चिम रेल्वे प्रशासनाने आयआयटी मुंबईची मदत घेतली होती.

आयआयटी मुंबईने केला अभ्यास
आयआयटी मुंबईने उपनगरीय रेल्वे मार्गावर ज्या ठिकाणी पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचते त्याठिकाणी भेट दिली. यावर सखोल अभ्यास केला असून, त्याच्या प्राथमिक अहवालात रेल्वेला सादर केला आहे. ज्यामध्ये दादर- लोअर परळ या भागासाठी पावसाचे पाणी साठविण्यासाठी एक ६ हजार चौ.मी. आणि दुसरा ३ हजार चौ.मी. आणि दोन्ही प्रत्येकी ३ मीटर खोलीचे दोन तलाव प्रस्तावित केले आहेत. मध्य रेल्वेच्या कुर्ला- एलटीटी भागासाठी एक १६ हजार चौ.मी. आणि दुसरा ३६ चौ.मी. प्रस्तावित करण्यात आला आहेत. याशिवाय दीर्घकालीन उपायासाठी दादर- लोअर परळ विभागात १७ हजार चौ.मी. आखणी एक होल्डिंग तलाव तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच मुंबई आयआयटीकडून लवकरच अंतिम अहवाल रेल्वेला सादर करणार आहे.

७ अतिरिक्त भूमिगत पर्जन्य जलवाहिन्या
यापूर्वी मध्य रेल्वेने पाणी साचणाऱ्या रेल्वे स्थानकादरम्यान अत्याधुनिक मायक्रो- टनेलिंग पद्धतीने पर्जन्य जल वाहिन्या तयार करण्यात आले आहे. कारण पावसाळ्यात रेल्वे रुळाच्या बाजूचा नाल्यातून पाण्याचा विसर्ग होतो. त्यामुळे, रेल्वे रुळावर पाणी साचते. या पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा याकरिता पावसाचे पाणी साचणाऱ्या रेल्वे रुळाच्या बाजूला अत्याधुनिक मायक्रो टनेल बोरिंग मशीनच्या माध्यमातून भूमिगत पर्जन्य जलवाहिन्या तयार करण्यात येत आहेत. आतापर्यत रेल्वेने दोन ठिकाणी भूमिगत पर्जन्य जल वाहिन्या तयार केल्या आहेत. आता कुर्ला, विद्याविहार, सँडहर्स्ट रोड, मशीद, वांद्रे, वसई आणि नालासोपारा येथे मायक्रो-टनेलिंग पद्धतीने ७ अतिरिक्त भूमिगत पर्जन्य जल वाहिन्या तयार करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.