ETV Bharat / city

कला सीईटीच्या निकालात एकाही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही - उदय सामंत

author img

By

Published : Dec 7, 2020, 12:56 AM IST

कला सीईटीच्या संदर्भात अनेक तक्रारी आल्या असून, या तक्रारी दोन्ही बाजूच्या आहेत. त्यामुळे या अडचणी दूर करण्यासाठी सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून, या बैठकीनंतर योग्य तो निर्यण घेतला जाईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Art CET Latest News
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई - कला सीईटीच्या संदर्भात अनेक तक्रारी आल्या असून, या तक्रारी दोन्ही बाजूच्या आहेत. त्यामुळे या अडचणी दूर करण्यासाठी सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून, या बैठकीनंतर योग्य तो निर्यण घेतला जाईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ते रविवारी मुंबईत बोलत होते.

नेमके काय आहे प्रकरण ?

राज्य कला संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचे 18 आणि 19 ऑक्टोबरला आयोजन करण्यात आले होते. तब्बल 2200 विद्यार्थ्यांनी ही सीईटी दिली. या परीक्षेत महाराष्ट्रातील सर्व परीक्षा केंद्रांवर एकाच दिवशी अर्ध्या तासांच्या अंतराने चार विषयाचे पेपर घेण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांची मोठी दमछाक झाली होती. अर्ध्या तासाच्या अंतराने घेण्यात आलेल्या या सीईटीच्या परीक्षेत, असाइनमेंट वरील रंगकाम न सुकल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असल्याची तक्रार पालकांकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. तसेच दोन दिवस या परीक्षा घेण्यात आल्या असल्या तरी अनेक विद्यार्थ्यांना त्यासाठीचा वेळ अपुरा पडला होता. शिवाय ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा अत्यंत चांगल्या प्रकारे दिली होती, अशा अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याने त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. या सीईटीचा 1 डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला असून, या निकालानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीव उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी बैठक बोलावली असून, योग्य तो निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कला सीईटीच्या निकालात एकाही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही

या आहेत पालकांच्या तक्रारी

एकाच पेपरला मूल्यमापन करण्यासाठी लिखित निकष लावण्यात आले होते.

जे पेपर तपासण्यात आले ते तज्ञ व्यक्तीकडून न तपासता एका खासगी संस्थेला ते देण्यात आले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाला.
निकालानंतर विद्यार्थ्यांना जे गुण मिळाले आहेत ते संशयास्पद आणि शंका निर्माण करणारे आहेत.

एका खासगी कंपनीने सर्व पेपर तपासले असल्याने, मुल्यमापणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चुकीच्या पद्धतीने पेपर तपासण्यात आल्याने, मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही सीईटी रद्द करून गुणवत्तेवर प्रवेश देण्यात यावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.