ETV Bharat / city

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते १८ दिवसांनी तुरुंगाबाहेर; राज्य सरकारविरोधात आक्रमक

author img

By

Published : Apr 26, 2022, 8:23 PM IST

Updated : Apr 26, 2022, 10:26 PM IST

वकील गुणरत्न सदावर्ते आर्थर रोड तुरुंगाबाहेर (Gunaratna Sadavarte released Arthur Road Jail) आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणात (Silver Oak Attack Case) गावदेवी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आज मुंबई उच्च न्यायालयाने सदावर्ते यांना जामीन मंजूर केला आहे. काही वेळापूर्वीच सदावर्ते ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर आले.

Gunaratna Sadavarte
वकील गुणरत्न सदावर्ते

मुंबई - वकील गुणरत्न सदावर्ते आर्थर रोड तुरुंगाबाहेर (Gunaratna Sadavarte released Arthur Road Jail) आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणात (Silver Oak Attack Case) गावदेवी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आज मुंबई उच्च न्यायालयाने सदावर्ते यांना जामीन मंजूर केला आहे. काही वेळापूर्वीच सदावर्ते ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय तुरुंगाबाहेर वाट पाहत होते. बाहेर येताच सदावर्तेंनी घोषणाबाजी केली.

प्रतिक्रिया देताना वकील गुणरत्न सदावर्ते

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हिंसक आदोलन केल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक झाली होती. अखेर ते तुरुंगाबाहेर आले आहेत. सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांनी आर्थर रोड तुरुंगाबाहेर सदावर्तेंच्या गळ्यात हार घालून त्यांचे जंगी स्वागत केले. सदावर्ते तब्बल 18 दिवस तुरुंगामध्ये होते.

18 दिवसानंतर सदावर्ते तुरुंगाबाहेर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सदावर्ते आणि काही एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदावर्ते यांची महाराष्ट्रवारी सुरु झाली. पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, अकोला, सोलापूरपर्यंत गुन्हे नोंद झाले होते. दरम्यान, पुणे पोलीस सदावर्ते यांना ताब्यात घेणार होते. मात्र, न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला आहे.

सदावर्ते पुन्हा आक्रमक - तुरुंगामधून बाहेर पडताच 'हम है हिंदुस्थानी' म्हणत सदावर्तेंनी घोषणाबाजी केली. या भारताच्या संविधानापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, असेही सदावर्ते म्हणाले. महाराष्ट्रातील, देशातील हिंदुस्थानी कष्टकरी हे आमच्या सोबत राहिले. यापुढे आमचा केंद्रबिंदू असेल भ्रष्टाचार, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करु. परंतू जय श्रीराम म्हणणारे, जय भीम म्हणणारे आणि वंदे मातरम म्हणणारे, हम है हिंदुस्थानी म्हणणारे जिंकत असतात. हा विजय हिंदुस्थानी नागरिकांचा, एसटी महामंडळातील कष्टकऱयांचा आहे, असे म्हणत या अन्यायाविरोधात मला माझी पत्नी आणि मित्र परिवाराने साथ दिली, असेही सदावर्ते म्हणाले.

एसटी संपावर उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल आल्यानंतर शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक घरावरील हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी सदावर्तेंना 8 एप्रिल रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचा ताबा अनुक्रमे सातारा, कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला होता.

मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा - मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत पुण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच याप्रकरणी अटक झाल्यास त्यांची 25 हजारांच्या जामीन अर्जावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देशही न्यायालयाने पुणे पोलिसांना दिलेत.

हेही वाचा - Gunaratna Sadavarte Solapur : मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूरनंतर आता सोलापुरातही सदावर्तेंवर गुन्हा दाखल

सदावर्तेंविरोधात मुंबईसह कोल्हापूर, पुणे, अकोट, अकोला येथेही गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दरम्यान त्यांना कोल्हापूरच्या गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. पुण्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळाला असल्याने त्याचेही पेपर जामीनपेटीत टाकण्यात आले होते. पुणे पोलिसांनी कोल्हापूर सत्र न्यायालयातून सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी वॉरंट आणले होते. त्यामुळे पुण्याच्या गुन्ह्याचे अटकपूर्व जामीन अर्जाचे पेपर्स तपासले जाणार आहेत. हे दोन्ही निकालाचे पेपर आज तुरुंग प्रशासनाला प्राप्त झाल्यावर सदावर्ते आजच बाहेर येऊ शकतात अन्यथा ते उद्या बाहेर येतील अशी माहिती सूत्रांनी दिली होती. अखेर आज त्यांची सुटका झाली आहे.

विविध ठिकाणी होते गुन्हे दाखल - एसटी कर्मचाऱ्यांना भडकवणे आणि सिल्व्हर ओकवर हल्ला करण्याच्या आरोपांखाली सदावर्तेंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचे प्रकरण समोर आले. यानंतर सदावर्तेंवर एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करुन खोटे आश्वासन देवून पैसे वसूल केल्याच्या आरोपांप्रकरणी राज्यातील काही भागांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तर काही ठिकाणी छत्रपती घराण्याच्या वंशजांवर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुणे पोलीस घेणार होते ताबा - पुण्याच्या विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचा ताबा घेण्यासाठी विद्यापीठ पोलीस मुंबईत आले होते. त्यांनी आर्थर रोड जेल प्रशसनाकडे ताबा मिळविण्यासाठी अर्ज केला होता. पण त्याविरोधात सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन काही अटी व शर्तीवर मंजूर केल्यामुळे पुणे पोलिसांना ताबा घेता आला नाही.

हेही वाचा - Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते येणार अडचणीत, पुण्यात गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Last Updated : Apr 26, 2022, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.