ETV Bharat / city

Governor Controversial Statement : राज्यपालांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; 'मुंबईतून गुजराथी राजस्थानी गेले तर ओळख मिटेल', अश्या आल्या प्रतिक्रिया...

author img

By

Published : Jul 30, 2022, 8:17 AM IST

Updated : Jul 30, 2022, 9:08 PM IST

महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही असे वादग्रसत्त वक्तव्य (controversial statement) राज्यपाल भगतसिंह कोशारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे.

Governor Controversial Statement
एकदा वादग्रस्त विधान

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे (controversial statement). महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही असे वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज्यपालांवर टीका केली आहे. तर, राज्यपालांनी नको त्या गोष्ट्रीत नाक खुपसू नये, गुण्या गोविंदान नांदावं असा सल्ला मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले - आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या राज्यपालांनी या वेळेस थेट मुंबईबाबत एक मोठं विधान केलं आहे. मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात. म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं थेट विधान केलं आहे. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही राज्यपाल म्हणाले आहेत.



शिवसेना पक्षप्रमुख कडाडले - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( governor bhagat singh Koshyari ) यांनी मुंबई व महाराष्ट्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) जोरदार हल्ला चढवला आहे. कोश्यारी यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान केला आहे. ते खपवून घेतले जाणार नाही. तसेच त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे असे ठाकरे म्हणाले मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सविस्तर वाचा...

शरद पवार - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) सारखे व्यक्ती जर, अशी वागत असतील तर लोकांनी लोकशाहीवर विश्वास ठेवायचा कसा हा मोठा प्रश्न आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी म्हटले आहे. ते धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस भवनच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. सविस्तर वाचा...

राष्ट्रवादी आणि मनसेचे नेते भडकले - महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही असं वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज्यपालांवर टीका केली आहे. तर, राज्यपालांनी नको त्या गोष्ट्रीत नाक खुपसू नये, गुण्या गोविंदान नांदावं असा सल्ला मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.

  • आता तरी..
    ऊठ मराठ्या ऊठ..
    शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे..
    बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत..
    मराठ्या तुलाच उठावे लागेल.. pic.twitter.com/QYX4weHdQ2

    — Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संजय राऊत - राजस्थानी आणि गुजराती माणसांच्या हातात मुंबईतील आर्थिक नाड्या आहेत. मुंबईच्या विकासात गुजराती आणि राजस्थानी माणसांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे गुजराती आणि राजस्थानी माणूस गेला, मुंबई आर्थिक राजधानी राहील काय, असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी केला होता. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर आता टीका करण्यात येत आहे. खासदार संजय राऊत यांनीही त्यांच्यावर टीका केली असून थोडक्यात काय तर मराठी माणूस भिकारडा आहे. हा 105 हुतात्म्यांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा...

अमोल मिटकरी - महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसली जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय. महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.

मनसे नेते संदिप देशपांडेचा राज्यपालांना सल्ला - मुंबई महाराष्ट्राला मिळाली ती १०५ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे. मुंबईची प्रगती आणि महाराष्ट्राची प्रगती इथे राहणाऱ्या मराठी माणसामुळे झालेली आहे. जे बाहेरचे आले, त्यांना मुंबईने सामावून घेतले आहे याचा अर्थ त्यांच्यामुळे मुंबईची प्रगती झाली नाही. मुंबई महाराष्ट्रात आहे राज्यपालांनी पहिले समजून घ्यावं. मराठी माणसामुळेच मुंबई आहे आणि महाराष्ट्र आहे तिथे काय कोणी बाहेरचे आले आणि त्यांनी प्रगती त्याच्यामुळे आपली प्रगती झाली नाही त्यांची प्रगती झालेली आहे असे संदिप देशपांडे म्हणाले.

दीपक केसरकर - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी बोरिवलीतील एका कार्यक्रमात पुन्हा वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राज्यपाल कोश्यारींची केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. सविस्तर वाचा...

छगन भुजबळ - राज्यपाल यांनी वाद होईल असे वक्तव्य करणे शक्यतो टाळावे. राज्यपालांचे मुंबई बद्दल हे वक्तव्य अप्रस्तुत असून वाद नको, राज्यपालांनी नेहमी निर्विवाद असावे असे मत राज्याचे माजी उपमख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. सविस्तर वाचा...

राज्यपालांच्या विधानाचे समर्थन - काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना भाजप यांचं राज्यात सरकार राहील. मुख्यमंत्री देखील याच पक्षांचे राहिले आहे आहेत. अधिकांश मंत्री हे मराठा समाजाचे राहिले आहे. त्यामुळे यांनी राज्यात राज्य कस केलं यावर केलेलं हे विधान आहे. राज्य जरी मराठ्यांचे असले तरी, आर्थिक सत्ता येथील मराठ्यांच्या हाती नाही तर, ती राजस्थानी, गुजराथी लोकांच्या हाती आहे. हे दाखवण्यात आल आहे. त्यामुळे या सगळ्यांना आपल पित्तळ उघड पडल म्हणून राज्यपाल यांची उचलबांगडी करा अस म्हणत आहे. आम्ही राज्यपालांच्या विधानाचे समर्थन करत आहोत असे, यावेळी आंबेडकर म्हणाले. सविस्तर वाचा...

देवेंद्र फडणवीस - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले ( Deputy CM Disagree with statement of Governor ) आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणसाचे योगदान मोठे आहे. अन्य समाजांनीही योगदान दिलेले आहे, मात्र मराठी माणसाचे योगदान यात सर्वाधिक असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ते दोंडाईचा ( Dondaicha ) येथे माध्यमांशी बोलत होते. सविस्तर वाचा...

संभाजी ब्रिगेडचा इशारा - गुजराती व राजस्थानी लोकांनी पैसे काढून घेतले तर मुंबईत पैसेच शिल्लक राहणार नाही. देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संभाजी ब्रिगेड चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. सविस्तर वाचा...

हेही वाचा - Maratha Reservation : मराठा समाजाला मोठा धक्का, EWS आरक्षण उच्च न्यायालयाकडून रद्द

Last Updated :Jul 30, 2022, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.