ETV Bharat / city

Uddhav Thackeray : 'ते पार्सल मराठी माणसाचा अपमान करत असेल तर....'; राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावरुन उद्धव ठाकरे कडाडले

author img

By

Published : Jul 30, 2022, 1:49 PM IST

Updated : Jul 30, 2022, 3:20 PM IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( governor bhagat singh Koshyari ) यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान केला आहे. ते खपवून घेतले जाणार नाही. तसेच त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे, असे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले. मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्राचा अपमान केल्यास कोल्हापुरी चप्पल दाखवू
महाराष्ट्राचा अपमान केल्यास कोल्हापुरी चप्पल दाखवू

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( governor bhagat singh Koshyari ) यांनी मुंबई व महाराष्ट्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) जोरदार हल्ला चढवला आहे. कोश्यारी यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान केला आहे. ते खपवून घेतले जाणार नाही. तसेच त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे असे ठाकरे म्हणाले मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

'ते पार्सल मराठी माणसाचा अपमान करत असेल तर....' - ज्या महाराष्ट्राचे मीठ तुम्ही तीन वर्ष खात आहात, त्या मिठाशी तुम्ही नमकहरामी केली आहे. जे नवहिंदूवादी आहेत. ज्यांना हिंदुत्वाचे मोड फुटले आहेत. ते कडवे असतील तर त्या मोडधारी सत्ताधारी हिंदूंना ते हिंदू असतील आणि मराठी असतील तर त्या सरकारने राज्यपालांविषयी भूमिका घेतली पाहिजे. जे पार्सल कुठून तरी पाठवले आहे. ते पार्सल राज्यपालपदाचा आदर राखत नसेल महाराष्ट्रात राहून जातीपाती आणि धर्मात आग लावण्याचे काम करत असेल मराठी माणसाचा अपमान करत असेल, तर त्यांना घरी पाठवायचे की तुरुंगात पाठवायचे हा निर्णय सरकारने घ्यावा, समस्त हिंदूंच्यावतीने मी ही मागणी करतो असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या नशिबी अशी माणसं का येतात? पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटले की, राज्यपाल म्हणून त्या खुर्चीचा मान राज्यपालांनी ठेवला पाहिजे. पण त्या खुर्चीत बसवलेल्या कोश्यारींनी त्या खुर्चीचा मान ठेवला नाही. गेल्या तीन वर्षांतील त्यांची विधाने असतील काही त्यांचे कॅमेऱ्याने टिपलेली दृष्य असतील ते पाहिल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी असे माणसे का येतात हा प्रश्न पडतो. मी मुख्यमंत्री असताना लॉकडाऊनच्या काळात लोकांचे प्राण जात होते. तेव्हा यांना सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे उघडण्याची घाई झाली होती. मी तो विषय वाढवला नाही. त्यांनी पत्र दिलं त्यावर मी उत्तर दिलं होतं. मी मुख्यमंत्री म्हणून तेव्हा जबाबदारी पार पाडली. मध्ये सावित्रीबाई फुलेंबद्दलही ते वादग्रस्त बोलल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की राज्यपाल हे राष्ट्रपतीचे दूत असतात. जातपात धर्माच्या पलिकडे जाऊन सर्वांना समान वागणूक देणं हे त्याचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य मोडलं असेल तर त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा. दुसरा गुन्हा म्हणजे त्यांनी हिंदूत फूट पाडण्याचं काम केलं आहे. राज्यपालांनी फूट पाडण्याचं काम केलं आहे. हा त्यांचा अधिकार आहे का? ज्या राज्यात जाता तिथे सुखाने नादणाऱ्या लोकांमध्ये फूट पाडून वातावरण खराब करतात. आता कोश्यारींना घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायचं याचा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावर आता सर्वच स्तरातून टिका केली जातंय.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की ज्या महाराष्ट्राचे मीठ तुम्ही तीन वर्ष खात आहात त्या मिठाशी तुम्ही नमकहरामी केली आहे. जे नवहिंदूवादी आहेत ज्यांना हिंदुत्वाचे मोड फुटले आहेत. ते कडवे असतील तर त्या मोडधारी सत्ताधारी हिंदूंना ते हिंदू असतील आणि मराठी असतील तर त्या सरकारने राज्यपालाविषयी भूमिका घेतली पाहिजे. हे पार्सल कुठेतरी पाठवलं आहे. ते पार्सल राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल महाराष्ट्रात राहुन जाती पाती आणि धर्मात आगी लावत असेल मराठी माणसाचा अपमान करत असेल तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हा करायला हवे. घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायचं हा निर्णय त्या स्तरावर घेतला जावा ही हिंदूंच्यावतीने मागणी आहे असेही ठाकरे म्हणाले आहेत.

कोल्हापूरचा जोडा दाखवा - भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या दोन-अडीच वर्षांच्या काळात सुंदर लेण्या शिवरायांचे गड-किल्ले व इतर सर्व चांगल्या गोष्टी पाहिल्या असतील. मात्र आता त्यांना कोल्हापूरचा जोडा दाखवण्याची देखील वेळ आली आहे. कारण कोल्हापुरी जोडा हेही महाराष्ट्राचं वैभव आहे. त्याचा अर्थ कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र जगप्रसिद्ध कोल्हापुरी जोडे कोश्यारींना दाखवण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा - Big Decision On Dahihandi : दहीहंडीच्या पार्श्वभुमीवर शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Last Updated :Jul 30, 2022, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.