Deputy CM Devendra Fadnavis : राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाहीत - देवेंद्र फडणवीस

author img

By

Published : Jul 30, 2022, 5:03 PM IST

Deputy CM Devendra Fadnavis

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणसाचे योगदान मोठे आहे. अन्य समाजांनीही योगदान दिलेले आहे, मात्र मराठी माणसाचे योगदान यात सर्वाधिक असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

दोंडाईचा ( धुळे ) - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले ( Deputy CM Disagree with statement of Governor ) आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणसाचे योगदान मोठे आहे. अन्य समाजांनीही योगदान दिलेले आहे, मात्र मराठी माणसाचे योगदान यात सर्वाधिक असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ते दोंडाईचा ( Dondaicha ) येथे माध्यमांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यपाल बदलीवर बोलणे टाळले - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बदलीबाबत बोलणे टाळले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बदलून त्यांच्या जागी दुसरे राज्यपाल महाराष्ट्राला मिळावेत अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली होती. त्याबाबत प्रश्न विचारण्यात आले. मात्र, त्यांनी त्या प्रश्नांवरती बोलणे टाळले. या वक्तव्याबाबत अधिक भूमिका हे राज्यपाल व्यक्त करतील असे त्यांनी पुढे सांगितले.

भगतसिंग कोश्यारी यांचे वैयक्तिक मत - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे वक्तव्य केले ते त्यांचे वैयक्तिक मत होते. महाराष्ट्राच्या विकासात मराठी माणूस आणि मराठी उद्योजकांची भूमिका महत्वाची आहे. राज्यपाल त्यांच्या वक्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण देतील. राज ठाकरे यांनी राज्यपाल हटवायची केलेली मागणी ही त्यांची वैयक्तिक मागणी असून एकूण सर्वच वक्तव्यावर राज्यपाल आपली भूमिका स्पष्ट करतील. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


राज्यपाल नेमकं काय म्हणाले - आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या राज्यपालांनी या वेळेस थेट मुंबईबाबत एक मोठं विधान केले आहे. मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात. म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटले जाते. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असे थेट विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही राज्यपाल म्हणाले आहेत.

हेही वाचा - CM Eknath Shinde : भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले....!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.