ETV Bharat / city

Padalkar Criticized Jayant Patil: जिल्हाधिकारी कार्यालय बापाची जहागीरदारी पाटील सत्तेतून हद्दपार - पडळकर

author img

By

Published : Sep 28, 2022, 7:11 PM IST

Gopichand Padalkar Criticized Jayant Patil: सत्तेचा माज चांगला नसतो आणि गैरवापर करणेही चांगले नसते, अश्या शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय Collector Office बापाची जहागीरदारी समजणारे, जयंत पाटील आता सत्तेतून हद्दपार झाले आहे. अशी जहरी टीकाही आमदार गोपीचंद पडळकर MLA Gopichand Padalkar यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर guardian minister jayant patil केली आहे.

Gopichand Padalkar Criticized Jayant Patil
Gopichand Padalkar Criticized Jayant Patil

सांगली सत्तेचा माज चांगला नसतो आणि गैरवापर करणेही चांगले नसते, अश्या शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय Collector Office बापाची जहागीरदारी समजणारे, जयंत पाटील आता सत्तेतून हद्दपार झाले आहे. अशी जहरी टीकाही आमदार गोपीचंद पडळकर MLA Gopichand Padalkar यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर guardian minister jayant patil केली आहे.

पडळकरांची टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. पालकमंत्री असताना सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजनाच्या बैठकीला विधान परिषद सदस्यांना बोलवत नसल्याच्या प्रश्नावरून जोरदार टीका आमदार पडळकर यांनी केले आहे. आमदार पडळकर म्हणाले, जयंत पाटलांच्या मनात प्रचंड भीती होती. त्यांचे काहीतरी बाहेर निघेल, आणि जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या बापाची जहागिरीदारी असल्याप्रमाणे जयंत पाटील वागले होते. जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्या बापाची जहागिरीदारी असल्याप्रमाणे वागत होते.

पडळकरांची टीका

सत्तेचा गैरवापर करणे चांगले नसते तसेच माझ्या भावाला हाद्दपारीची नोटीस काढली, पण तेच आता सत्तेतून हद्दपार झाले. पण सत्तेचा माज चांगला नसतो, आणि सत्तेचा गैरवापर करणे चांगले नसते, त्यांना वाटले आम्ही शरण येऊ, पण आम्ही शरण येणारे नाही, आता आमचे पालकमंत्री जिल्हा नियोजनाची बैठक घेतील. त्यावेळी सगळ्यांनी बोलावले जाईल, असा टोलाही पडळकरांनी लगावला आहे. धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवर 2 ऑक्टोंबर रोजी दसरा मेळाव्याचा आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.

आरेवाडी येथे मेळावा पार पडणार धनगर समाजाचे आराध्य दैवत बिरोबाच्या बनात आरेवाडी येथे हा मेळावा पार पडणार असून यावेळी मेंढपाळांच्या हिताच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीसाठी संघटना स्थापन करण्यात येणार असल्याचे आमदार पडळकर यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, धनगर समाजाच्या समस्या अडचणी व विविध प्रश्नांवर दरवर्षीप्रमाणे यंदाही 2 ऑक्टोंबर रोजी दसरा मेळावा पार पडणार आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या बिरोबाच्या बनात होणार आहे, अशी माहिती दिली आहे.

धनगर आरक्षण बाबत तसेच धनगर आरक्षण प्रश्नावर बोलताना पडळकर म्हणाले, धनगर आरक्षण बाबत हायकोर्टात केस सुरू आहे. सुदैवाने धनगर समजला न्याय देणारे सरकार आले आहे. आता तारखा सुरू आहेत. त्यामुळे आता अपेक्षा आहे. हे सरकार धनगर समाजाला एसटीचा दाखल देईल, असे मत व्यक्त केला. तर मेंढपाळ यांच्या चारा आणि होणाऱ्या हल्ल्यांबाबत बोलताना पडळकर म्हणाले. मेंढपाळाच्या चराऊ कुरणाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे वनमंत्री यांच्याकडून शब्द दिला आहेत. शेळया- मेंढ्यांच्या विमा उतरवण्याचा निर्णय घेऊन 100 कोटींची निधी तरतूद करण्याचा शब्द पशुसंवर्धन मंत्री विखे- पाटील यांनी दिला आहे, तसेच शेळया- मेंढ्यांच्या संघटना येत्या दसरा मेळाव्यात स्थापन करणार आहे. त्याचबरोबर मेंढपाळ यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याबाबत कायदा करावा, अशी आपली मागणी आहे. तसेच मेंढापालांना वन क्षेत्रात चराऊ पास मिळण्याबाबत मागणी करणार आहे, असे स्पष्ट केले आहे.

एसटी विलनीकरण बाबतीत म्हणाले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे, न भूतो- ना भविष्य झाले. एसटी विलनीकरणसाठी तत्कालीन मंत्र्यांनी एसटी विलनीकरण होऊ शकत, नसल्याचे स्पष्ट केले होते. आम्ही आंदोलन केले. पण 5 हजारांची वाढ केली. मात्र एसटी विलनीकरण व अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांना घेऊन आज ही आपण मंत्र्यांना घेऊन बैठक घेत आहोत. आणि भविष्यात एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणारा, असा विश्वास देखील आमदार पडळकर यांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.