ETV Bharat / city

सोलापूर अपघात प्रकरणी परिवहन मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

author img

By

Published : Nov 16, 2021, 7:35 PM IST

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप (st workers strike) सुरू असल्याने प्रवाशांच्या सेवेसाठी खासगी गाड्या चालवल्या जात आहेत. त्यापैकी अक्कलकोटवरून सोलापूरला जाणाऱ्या जीपचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी परिवहन मंत्री (minister anil parab), परिवहन विभागाचे सचिव तसेच, परिवहन विभागाच्या आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) व सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात केली आहे.

Gopichand Padalkar case demand parab
अनिल परबवर गुन्हा दाखल मागणी

मुंबई - एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप (st workers strike) सुरू असल्याने प्रवाशांच्या सेवेसाठी खासगी गाड्या चालवल्या जात आहेत. त्यापैकी अक्कलकोटवरून सोलापूरला जाणाऱ्या जीपचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी परिवहन मंत्री (minister anil parab), परिवहन विभागाचे सचिव तसेच, परिवहन विभागाच्या आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar news) व सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात केली आहे.

हेही वाचा - राज्य सरकार गुन्हेगार व दहशतवाद्यांचे समर्थक.. ठाकरे सरकारकडून हिंदू धर्म व महाराष्ट्र धर्मावर घाला - आशिष शेलार

गुन्हा दाखल करण्याची मागणी

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे व इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी २७ ऑक्टोबर पासून संपावर (msrtc strike) गेले आहेत. मागील आठवड्यापासून मुंबईच्या आझाद मैदानात एसटी कर्मचारी (st workers strike azad maidan) भाजपा नेते गोपीचंद पडळकर आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहेत. राज्य सरकारबरोबर संपकरी कर्मचाऱ्यांची बोलणी सुरू असली तरी त्यामधून अद्याप तोडगा निघालेला नाही. संप सुरू असल्याने एसटी महामंडळ आणि राज्य सरकारने प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी गाड्या सोडल्या आहेत. या खासगी गाड्यांपैकी एका भरधाव जीपचा आज टायर फुटल्याने सोलापूर अक्कलकोट रोडवर अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन विभागाचे सचिव, परिवहन विभागाचे आयुक्त तसेच, एसटी महामंडळाचे आयुक्त यांच्या विरोधात गुन्हा दाखल कारण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

टायर फुटल्याने गाडी उलटली

अक्कलकोटहून सोलापूरकडे जाणाऱ्या क्रुजर गाडीचे (एमएच 13 एएक्स 1237) ड्रायव्हरच्या बाजूकडील टायर फुटल्याने चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावरून पलटी झाली. ही गाडी अतिशय वेगात असल्याने ती दोन तीन वेळा उलटली. या अपघातात गाडीतील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 3 जण पुरुष आणि 2 महिला आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या गाडीतून सुमारे 13 ते 14 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, जखमींवर सोलापुरातील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. सोलापूर - अक्कलकोट रोडवरील महामार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. महामार्गावरून वाहने अधिक वेगाने जात असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - लैंगिक छळ करून फूटपाथवर राहणाऱ्या महिलेची हत्या, घाटकोपरमध्ये एकास अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.