ETV Bharat / city

Ganesh Utsav 2022 अंधेरीच्या राजाचा ७ कोटी ८० लाखांचा विमा, दर्शनासाठी 'हे' कपडे घातले तर प्रवेश नाही

author img

By

Published : Aug 31, 2022, 5:49 PM IST

Updated : Aug 31, 2022, 6:49 PM IST

Ganesh Utsav
गणेश उत्सव

मुंबईतील अंधेरीच्या राजा मंडळाने Andheri Raja Mandal दर्शनासाठी केलेल्या खास नियमांमुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसाठी ड्रेस कोडही Dress code for Lord Ganesha Darshan समितीने निश्चित केला आहे. लहान कपड्यांमध्ये कोणत्याही व्यक्तीला दर्शन घेता येत नाही. अंधेरीचा राजा गणपती बाप्पाचे Ganapati Bappa १४ दिवस पूजन करण्यात येते.

मुंबई - मुंबईतील अंधेरीच्या राजा मंडळाने Andheri Raja Mandal दर्शनासाठी केलेल्या खास नियमांमुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. अभ्यागतांना मंडळात लहान कपडे घालण्याची परवानगी नाही. वडोदराच्या लक्ष्मी विलास पॅलेसप्रमाणे बांधण्यात आलेला पंडाल पाहण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

बाप्पाला ३२ किलो चांदीचे दागिने - अंधेरीचा राजा गणपती बाप्पाचे Ganapati Bappa १४ दिवस पूजन करण्यात येते. संस्थेचे संचालक व माध्यम प्रभारी उदय सालियन यांनी अंधेरीच्या राजाच्या Raja Ganapati of Andheri in Mumbai स्थापनेला यंदा ५७ वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगितले. पंडालच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये मोठा उत्साह असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्याच दिवशी बाप्पाला ३२ किलो चांदीचे दागिने एका भक्ताने अर्पण केले आल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा - Maharashtra Ganeshotsav 2022 Live Updates : राज्यात गणरायाचे थाटामाटात आगमन.. पहा सर्व लाईव्ह अपडेट्स

७ कोटी 80 लाख रुपयांचा विमा - कोणत्याही धोक्यापासून बचावासाठी मंडळाने यंदा ७ कोटी 80 लाख रुपयांचा विमा उतरवला आहे. त्याचबरोबर दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसाठी ड्रेस कोडही Dress code for Lord Ganesha Darshan समितीने निश्चित केला आहे. लहान कपड्यांमध्ये कोणत्याही व्यक्तीला दर्शन घेता येत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पंडाल आणि इतर व्यवस्थेसाठी २५० हून अधिक स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत. वडोदराच्या लक्ष्मी विलास पॅलेसप्रमाणे Lakshmi Vilas Palace पंडालची थीम बनवण्यासाठी गेल्या २ महिन्यांपासून अहोरात्र काम सुरू आहे. उदय यांनी सांगितले की,२ वर्षांपूर्वी लक्ष्मी विलास पॅलेसच्या थीमवर गणेशोत्सव पंडाल बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे ते होऊ शकले नाही.

हेही वाचा - Ganeshotsav 2022 Pune कसबा ते केसरीवाडा, पहा यंदा ढोल ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींची आगमन मिरवणूक

Last Updated :Aug 31, 2022, 6:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.