ETV Bharat / city

KC Padvi : 'न्याय व्यवस्थेने लवकरात लवकर न्याय द्यावा'

author img

By

Published : Jul 15, 2022, 5:13 PM IST

राज्यातील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घटनापिठाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात अजूनही लोकशाही आणि न्यायव्यवस्था आहे, असे आम्ही मानतो, असेही माजी मंत्री केसी पाडवी ( Former minister KC Padvi ) यांनी म्हटले आहे.

KC Padvi
KC Padvi

मुंबई - बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागावा, अशी अपेक्षा माजी आदिवासी मंत्री केसी पाडवी यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घटनापिठाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात अजूनही लोकशाही आणि न्यायव्यवस्था आहे, असे आम्ही मानतो, असेही माजी मंत्री केसी पाडवी ( Former minister KC Padvi ) यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया देताना माजी मंत्री केसी पाडवी


अपेक्षित निकाल : सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा तसा अपेक्षितच होता. न्यायालयाने आता अधिक वेळ न लावता राज्यात सरकार अधांतरी अस्थिर आहे, अशी भावना जनमानसात होऊ नये यासाठी त्वरित निकाल दिला तर ते योग्य राहील. मग निकाल काहीही, असो असेही केसी पाडवी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Rolling Supporter for Bull : बैलांच्या मानेवरील ओझे हलके करणारा भन्नाट अविष्कार,अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी बनवले 'रोलिंग सपोर्ट'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.