ETV Bharat / city

Sunil Gavaskar Return Plot : आव्हाडांची नाराजी; सुनिल गावस्करांनी सरकारला भूखंड केला परत, वाचा काय आहे प्रकरण?

author img

By

Published : May 4, 2022, 8:42 PM IST

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar Return Plot ) यांनी महाराष्ट्र सरकारने 33 वर्षांपूर्वी दिलेला भूखंड परत केला ( Maharashtra Government ) आहे.

Sunil Gavaskar
Sunil Gavaskar

मुंबई - भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी महाराष्ट्र सरकारने 33 वर्षांपूर्वी दिलेला भूखंड परत केला ( Sunil Gavaskar Return Plot ) आहे. बांद्रा येथे लीलावती हॉस्पिटल जवळ असलेला अर्धा एकर भूखंड महाराष्ट्र सरकारने ( Maharashtra Government ) 1980 मध्ये सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला दिला होता. हा भूखंड भाडेतत्त्वावर दिला असून, या भूखंडाचा इनडोअर गेम खेळण्याची व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र, 33 वर्ष उलटून गेल्यानंतरही सुनील गावस्कर यांना अकादमी उभारता आली नाही.

मागील वर्षी याच मुद्द्यावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या अकादमीसाठी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि सुनील गावस्कर यांच्यामध्ये संवाद सुरू झाला होता. पण, आपल्या अन्य कामामुळे आपण अकादमी सुरू करू शकणार नाही, असे पत्र सुनील गावस्कर यांनी राज्य सरकारला पाठवले. तसेच, हा भूखंड परत करत असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.

राज्य सरकारने दिलेल्या भूखंडावर इनडोअर गेमसाठी अकादमी उघडण्याचा आपले स्वप्न होत. मात्र, गेल्या काही वर्षापासून सातत्याने आपण कामात व्यस्त असल्याने अकादमी सुरू करण्यास वेळ देऊ शकलो नाही. त्यामुळे आता आपण हा भूखंड राज्य सरकारला परत करत आहोत. पण, राज्य सरकार याच भूखंडावर भविष्यात एखादी अकादमी सुरू करण्याचा विचार करत असेल तर, त्या वेळेस आपण राज्य सरकारला नक्की मदत करू, असे देखील आपल्या पत्रातून सुनील गावस्करांनी राज्य सरकारला सांगितले आहे.

हेही वाचा - Mansukh Hiren Murder Case : एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा मनसुख हिरेनच्या हत्येचा मुख्य सूत्रधार; NIA चे प्रतिज्ञापत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.