ETV Bharat / city

Fire Breaks Out in Mumbai : मुंबईतील रे रोड परिसरातील बॉम्बे टिंबर मार्ट मार्केटमधील दुकानाला आग

author img

By

Published : May 5, 2022, 6:01 PM IST

Updated : May 5, 2022, 7:57 PM IST

मुंबई - मुंबईतील रे रोड परिसरातील बॉम्बे टिंबर मार्ट मार्केटमधील दुकानाला आग ( Fire breaks out in Reay Road area of Mumbai ) लागली आहे, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे अद्याप माहिती नाही.

Fire Breaks Out in Mumbai
बॉम्बे टिंबर मार्ट मार्केटमधील दुकानाला आग

मुंबई - मुंबईतील रे रोड परिसरातील बॉम्बे टिंबर मार्ट मार्केटमधील दुकानाला आग ( Fire breaks out in Reay Road area of Mumbai ) लागली आहे, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे अद्याप माहिती नाही.

  • Maharashtra | Fire breaks out in shop in Bombay Timber Mart Market in Reay Road area of Mumbai; six fire tenders are present at the spot. Fire fighting operations are underway. No casualties or injuries reported yet.

    — ANI (@ANI) May 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबईतील आगींच्या घटनांमध्ये वाढ -

मुंबईत गगनचुंबी इमारतीचे जाळे पसरले आहे. मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. तसेच हे शहर सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. परंतु, मुंबई आता आगीच्या घटनांचे शहर बनले आहे. कारण मागील दहा वर्षात मुंबईत तब्बल 48 हजार 434 आगीच्या घटना घडल्या असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे 2008 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती आगी लागल्या, तसेच किती गगनचुंबी इमारतात/ रहिवाशी इमारतीत / व्यावसायिक इमारतीत आणि झोपड्यात आग लागली? तसेच कोणत्या कारणामुळे आग लागली? आगीच्या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे? तसेच किती रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे? याबाबत माहिती विचारली होती.

आरटीआयमधून आलेली माहिती

आरटीआयमार्फत मिळालेली माहिती -

सदर माहिती संदर्भात मुंबई अग्निशमन दलाचे जनमाहिती अधिकरी तथा विभागीय अग्निशमन अधिकारी एस. डी. सावंत यांनी शकील अहमद शेख यांना माहिती अधिकार अधिनियम-2005 अन्वये माहिती दिलेली आहे. माहितीप्रमाणे सन 2008 पासून जुलै 2018 पर्यंत एकूण 48 हजार 434 आग लागण्याच्या दुर्घटना झाल्या आहेत. त्यात 1 हजार 568 गगनचुंबी इमारतींमध्ये आग लागली आहे. तसेच 8 हजार 737 रहिवाशी इमारतीत आग लागली आहे. 3 हजार 833 व्यावसायिक इमारतीत आग लागली आहे. तर 3 हजार 151 झोपडपट्ट्यांमध्ये आग लागली आहे. सर्वात जास्त तब्बल 32 हजार 516 आग लागण्याचे कारण शोर्टसर्किट आहे. तब्बल 1 हजार 116 आग गॅस सिलिंडर लिकेजमुळे लागली आहे. तर 11 हजार 889 आग अन्य कारणांमुळे लागली आहे. या घटनांमध्ये एकूण 609 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 212 पुरुष, 212 स्त्री आणि 29 मुलांचा समावेश आहे. तसेच आगीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

आरटीआयमधून आलेली माहिती

हेही वाचा - VIDEO : थरारक! आग लागलेल्या इमारतीहून खाली कोसळली एक व्यक्ती

परिमंडळ-I च्या हद्दीत एकूण 9 हजार 887 वेळा आग लागली असून, त्यात 325 गगनचुंबी इमारत, 1 हजार 546 रहिवाशी इमारत, 987 व्यावसायिक इमारत आणि 75 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे. तसेच परिमंडळ-II च्या हद्दीत सर्वात जास्त एकूण 10 हजार 719 वेळा आग लागली असून, त्यात 129 गगनचुंबी इमारत, 1 हजार 824 रहिवाशी इमारत, 664 व्यावसायिक इमारत आणि 934 झोपड्यात घटनेचा समावेश आहे. तसेच परिमंडळ-III च्या हद्दीत एकूण 8 हजार 717 आग लागली असून, त्यात 496 गगनचुंबी इमारत, 1 हजार 382 रहिवाशी इमारत, 939 व्यावसायिक इमारत आणि 443 झोपड्यात घटनेचा समावेश आहे. तसेच परिमंडळ-IV च्या हद्दीत एकूण 8 हजार 328 वेळा आग लागली असून, त्यात 289 गगनचुंबी इमारत, 1 हजार 835 रहिवाशी इमारत, 661 व्यावसायिक इमारत आणि 403 झोपड्यात घटनेचा समावेश आहे.

आरटीआयमधून आलेली माहिती

तसेच परिमंडळ-V च्या हद्दीत एकूण 5 हजार 683 वेळा आग लागली असून, त्यात 50 गगनचुंबी इमारत, 1 हजार 547 रहिवाशी इमारत, 208 व्यावसायिक इमारत आणि 1273 झोपड्यात घटनेचा समावेश आहे. तसेच परिमंडळ-VI च्या हद्दीत एकूण 5 हजार 107 आग लागली असून, त्यात 279 गगनचुंबी इमारत, 603 रहिवाशी इमारत, 374 व्यावसायिक इमारत आणि 23 झोपड्यात घटनेचा समावेश आहे.

सर्वात जास्त गगनचुंबी इमारतीत परिमंडळ-III च्या हद्दीत, एकूण 496 आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच सर्वात जास्त रहिवाशी इमारतीत परिमंडळ-IV च्या हद्दीत 1835 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच सर्वात जास्त व्यावसायिक इमारतीत परिमंडळ-I च्या हद्दीत 987 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच सर्वात जास्त झोपड्यात परिमंडळ-V च्या हद्दीत 1273 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच सर्वात जास्त एकूण 177 लोकांचा बळी परिमंडळ-I च्या हद्दीत झाला आहे. तसेच सर्वात जास्त आगीच्या घटनेत नुकसान एकूण 394809686 इतके रुपयांचे झाले आहे. तसेच वर्ष 2020 मध्ये एकूण 3 हजार 841 आगीच्या अपघातात 100 जणांचा मृत्यू व 298 जखमी झाले आहेत.

हेही वाचा - Ajit Pawar On Raj Thackeray : राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटमनंतर अजित पवारांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले...

Last Updated : May 5, 2022, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.