ETV Bharat / city

मुलुंड येथील नंदनवन इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गाळ्याला आग

author img

By

Published : May 4, 2021, 2:16 AM IST

मुलुंड येथील आशा नगर, मुलुंड(प.) मधील नंदनवन इंडस्ट्रीयल इस्टेट येथे एका गाळ्याला सोमवारी रात्री आग लागली. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

Fire breaks out at mulund
Fire breaks out at mulund

मुंबई - मुलुंड येथील आशा नगर, मुलुंड(प.) मधील नंदनवन इंडस्ट्रीयल इस्टेट येथे एका गाळ्याला सोमवारी रात्री आग लागली. आग विझवण्याचे काम सुरू असून त्यात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

मुलुंडमध्ये इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग

आग विझवण्याचे काम सुरू -

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास नंदनवन इंडस्ट्रीयल इस्टेट, आशा नगर, मुलुंड (प.) येथे एका गाळ्यामध्ये आग लागली. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे ५-फायर वाहन, ४-जम्बो वॉटर टँकर दाखल झाली आहेत. ही आग लेवल-१ ची असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.