ETV Bharat / city

Building Fire Mumbai : टिळक नगर येथील रेल व्हीव इमारतीला आग

author img

By

Published : Oct 8, 2022, 3:15 PM IST

Updated : Oct 8, 2022, 5:29 PM IST

Building Fire: मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनस येथील टिळक नगर येथे असलेल्या रेल व्हीव या इमारतीला आग लागली आहे. Building Fire आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल दाखल झाले आहे. इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे.

Building Fire
Building Fire

मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनस येथील टिळक नगर येथे असलेल्या रेल व्हीव या इमारतीला आग लागली आहे. Building Fire आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल दाखल झाले आहे. इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे.

Building Fire Mumbai
Building Fire Mumbai

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील टिळक नगर येथे असलेल्या रेल व्हीव या इमारतीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे. आगीत अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

टिळक नगर येथील रेल व्हीव इमारतीला आग

कोणीही जखमी नाही लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ रेल व्हीव १२ मजली इमारत आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर एका घरात आग लागली होती. आगीची माहिती मिळताच २ फायर इंजिन आणि १ जंबो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहे. पावणे तीन वाजता लेव्हल १ ची आग घोषित करण्यात आली आहे.

Building Fire
Building Fire

इमारतीमधील काही लोक अडकले असल्याने त्यांची सुटका करण्याचे आणि आग विझविण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहे. दरम्यान आगीची तीव्रता आणि धूर वाढला असल्याने अग्निशमन दलाकडून आगीच्या लेव्हल २ ची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान आगीमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

टिळक नगर येथील रेल व्हीव इमारतीला आग

१५ ते २० लोकांची सुखरूप सुटका इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आग लागली असताना इमारतीमधील काही लोक घरामध्ये होते. तर एक महिला पाचव्या मजल्यावरील सज्जावर अडकली होती. या महिलेला वाचवण्यासाठी गुड्डू नावाचा कामगार खाली उतरला मात्र इमारतीची उंची जास्त असल्याने ते दोघेही सज्जावर अडकले होते. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होताच सज्जावर अडलेल्या सह इमारतीमध्ये असलेल्या १५ ते २० लोकांची सुखरूप सुटका केली आहे. आग सध्या अग्निशमन दलाच्या नियंत्रणात आली असून या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

माजी महापौरांनी दिली भेट आगीची माहिती मिळताच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक अनिल कोकीळ उपस्थित होते. पेडणेकर यांनी इमारतीमधील नागरिकांशी संवाद साधला. तसेच आग लागल्याची घटना घडल्यावर ओला कपडा आपल्या तोंडावर लावावा आणि जिन्याच्या मार्गाने इमारतीबाहेर पडावे अशा सूचना केल्या आहेत.

Last Updated : Oct 8, 2022, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.