ETV Bharat / city

Thackeray concepts : राज्यात ठाकरे सरकारचे निर्णय बदलण्याचा धडाका, पण मुंबईत त्यांच्याच योजनेला प्राधान्य

author img

By

Published : Oct 8, 2022, 1:57 PM IST

Eknath Shinde carry forward Thackeray concepts
मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अनेक संकल्पना राबविल्या होत्या.राबवलेल्या संकल्पना पुढे नेण्याचे काम शिंदे आणि भाजपा सरकारकडून केले जात आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारचे सरकार ( Mahavikas Aghadi government ) जाऊन एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यावर महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्यात आले आहेत. तर मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ( Uddhav Thakre and Aditya Thakre in BMC ) यांनी राबवलेल्या संकल्पना पुढे नेण्याचे काम शिंदे आणि भाजपा सरकारकडून केले जात आहे. पूर्वीच्या संकल्पानांतून मुंबईच्या विकास कामांना सुरूवात करण्यात आली आहे.

मुंबई - राज्यात महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi government )सरकारचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यावर महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्यात आले आहेत. तर मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ( Uddhav Thakre and Aditya Thakre in BMC ) यांनी राबवलेल्या संकल्पना पुढे नेण्याचे काम शिंदे आणि भाजपा सरकारकडून केले जात आहे. पूर्वीच्या संकल्पानांतून मुंबईच्या विकास कामांना सुरूवात करण्यात आली आहे.

ठाकरेंच्या संकल्पनांची री : मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अनेक संकल्पना राबविल्या होत्या.राबवलेल्या संकल्पना पुढे नेण्याचे काम शिंदे आणि भाजपा सरकारकडून केले जात आहे. Eknath Shinde carry forward Thackeray conceptsमुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अनेक संकल्पना राबविल्या होत्या.

आघाडी सरकारची कामे थांबवली - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघडी सरकार स्थापन केले. अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. जून २०२२ मध्ये राज्यात शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे आणि भाजपने सरकार स्थापन केले. सरकार स्थापन होताच शिंदे-भाजपा सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द ( Shinde-BJP government canceled many decisions taken by the Mahavikas Aghadi government )केले. आमदार आणि माजी मंत्र्यांच्या विभागात सुरु होणारी अनेक कामे थांबवण्यात आली. शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारची कामे रद्द केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीकाही करण्यात आली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पना - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईकर नागरिकांना घराजवळ आरोग्य सुविधा मिळावी म्हणून २२७ प्रभागात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक आणि दवाखाने ( Balasaheb Thackeray Polyclinics and Hospitals ) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे नागरिकांवर मोफत उपचार होणार आहेत. पालिकेच्या दवाखान्यातील शुल्कानुसार चाचण्या होणार आहेत. हे दवाखाने लवकरात लवकर उघडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आतापर्यंत ५० दवाखाने आणि पॉलिक्लिनिक सुरु करण्यात आली आहेत. इतर लवकरच सुरु होणार आहेत. पश्चिम उपनगरातील ट्रॅफिकवर उपाय म्हणून उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. हा प्रकल्प आताचे मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

आदित्य ठाकरेंची संकल्पना - मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. या शहराला जगातील कानाकोपऱ्यातून पर्यटक भेट देतात. मुंबई हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे अशी संकल्पना महाविकास आघाडी सरकारमधील पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. यासाठी मुंबईच्या सौंदर्यीकरण यावर भर दिला होता. त्या अनुषंगाने वाहतूक बेटं, दुभाजक, पदपथ, स्कायवॉक, समुद्र किनारे, उद्याने यांच्या सुशोभीकरणाची कामे सुरु करण्यात आली होती. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईच्या सुशोभीकरणाची जी कामे सुरु होती ती कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईचे सुशोभीकरण - मुंबई शहरातील ३०० किमी लांबीच्या विविध ठिकाणच्या दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. १७० किमी लांबीच्या पदपथांवर प्रकाश योजना व सजावटीलसह मुंबईतील २५ महत्त्वाच्या पुलांची रोषणाई केली जाणार आहे. यासोबतच १८ स्कायवॉकना रोषणाई केली जाणार असून विविध आकाराचे स्ट्रीट फर्निचर देखील महत्त्वाच्या पदपथांवर बसविण्यात येणार आहेत. पुढील तीन महिन्यात ६१ वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. जुहू, गिरगाव चौपाटी, अक्सा, वर्सोवा, दादर, माहीम, गोराई या सात समुद्र किनाऱ्यावर त्रिमितीय प्रतिमा, कलाकृती, शिल्प साकारण्यात येणार आहे. उद्यानांमध्ये प्रकाशित कारंजे, पदपथ करण्यात येणार आहे. उद्याने पर्यटन स्थळे बनवण्यासाठी ग्लो उद्यान संकल्पना राबविली जाणार आहे. वांद्रे किल्ला, वरळी किल्ला, गेट वे ऑफ इंडिया, एशियाटिक वाचनालय, माझगांव उद्यान व अफगाण चर्च याठिकाणी प्रकाश योजनेच्या माध्यमातून सौंदर्यीकरण केले जाणार आहे. मियावाकी तंत्रज्ञान राबवून मुंबईमध्ये , गेट वे ऑफ इंडियाचे सुशोभीकरण याबाबत आढावा घेण्यात आला. मुंबईत २६ ठिकाणी धारावीच्या धर्तीवर तीनमजली स्वच्छतागृह करण्यात येणार असून, अत्याधुनिक बस थांबे करण्यात येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.