ETV Bharat / city

व्यावसायिक योगेश देशमुखांना ईडीकडून अटक; आमदार प्रताप सरनाईकांचे आहेत निकटवर्तीय

author img

By

Published : Apr 7, 2021, 12:40 AM IST

ईडीने मंगळवारी व्यावसायिक योगेश देशमुख यांना अटक केली आहे. योगेश देशमुख हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय मानले जातात.

ed office
ईडी कार्यालय

मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीय व्यावसायिकाला अटक केली आहे. योगेश देशमुख असे या ईडीकडून अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. 17 मार्च रोजी ईडीने योगेश देशमुख यांच्या घरावर छापेमारी केली होती. त्यावेळी योगेश देशमुख यांच्या पत्नीने ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली होती.

हेही वाचा - नागपूर जिल्ह्यात २४ तासांत ३ हजार ७५८ नागरिकांना कोरोनाची लागण

NSEL मनी लाँड्रिंग प्रकरणात योगेश देशमुख यांना अटक झाल्याची माहिती मिळत आहे. ईडीच्या छापेमारीनंतर योगेश देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

काय आहे प्रकरण?

ईडीने 24 नोव्हेंबरला शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे टाकले होते.

हेही वाचा - आम्ही फक्त दोन दिवसांच्या टाळेबंदीला सहमती दर्शवली होती - फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.