ETV Bharat / city

Amruta Fadnavis : महाविकास आघाडी जगातील सर्वात भ्रष्ट सरकार; अमृता फडणवीसांची टीका

author img

By

Published : Apr 10, 2022, 8:53 PM IST

Updated : Apr 10, 2022, 9:40 PM IST

महाविकास आघाडी हे राज्यात, देशात नाही ( Amruta Fadnavis Criticizes Mahavikas Aghadi ) तर संपूर्ण जगात सर्वात भ्रष्ट सरकार आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.

Amruta Fadnavis
Amruta Fadnavis

मुंबई - अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा ( Amruta Fadnavis Criticizes Mahavikas Aghadi )साधला आहे. महाविकास आघाडी हे राज्यात, देशात नाही तर संपूर्ण जगात सर्वात भ्रष्ट सरकार आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.

कार्यक्रमामध्ये अभिनेते जॅकी श्रॉफही उपस्थित- भाजप मुंबई चित्रपट, नाट्य आघाडीतर्फे चित्रपट, टेलिव्हिजन व ओटीटी या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी महा रोजगार मेळाव्याचे आयोजन मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात करण्यात आले होत. या कार्यक्रमामध्ये अभिनेते जॅकी श्रॉफ, शिव ठाकरे, अभिनेत्री क्रांती रेडकर उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना अमृता फडणीस यांनी अशा पद्धतींचे रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल भाजपाचे आभार मानले.

अमृता फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना

'सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही' - प्रसारमाध्यमांशी बोलताना अमृता फडणवीसांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचे कोणीही समर्थन करणार नाही. परंतु, अशा पद्धतीच्या घटना होण्यामागे नेमकं कारण काय आहे? कारण एसटी कर्मचाऱ्यांचा संप पाच महिन्यांपासून अधिक काळ चालला आहे. त्यांच्याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. कामगार मेटाकुटीस आलेला असताना त्यांच्यावर सरकारला लक्ष देणे गरजेचे असते. त्याचबरोबर जो काही हल्ला शरद पवार यांच्या घरी झालेला आहे. त्याचे भाजपाच नाही तर कोणीही समर्थन करणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटलं.

हेही - Yashomati Thakur Amravati : शरद पवार मुख्यमंत्री असते, तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते - यशोमती ठाकुर

Last Updated : Apr 10, 2022, 9:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.