ETV Bharat / city

निवासी डॉक्टरांच्या प्रश्नावर सचिवांच्या बैठकीतही तोडगा नाही; बेमुदत संप सुरुच

author img

By

Published : Oct 1, 2021, 9:20 PM IST

राज्यातील निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवार १ ऑक्टोबरला सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सरकारी आणि पालिका रुग्णालयातील ओपीडीवर याचा परिणाम झाला आहे. अर्थ व आरोग्य सचिवांना निवासी डॉक्टरांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात यश आले नाही.

निवासी डॉक्टर
निवासी डॉक्टर

मुंबई - निवासी डॉक्टरांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या अर्थ तसेच आरोग्य सचिव यांच्यासोबत मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. मात्र त्यातून कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. त्यामुळे बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मार्ड प्रतिनिधींनी सांगितले.

राज्यातील निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवार १ ऑक्टोबरला सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सरकारी आणि पालिका रुग्णालयातील ओपीडीवर याचा परिणाम झाला आहे. अर्थ व आरोग्य सचिवांना निवासी डॉक्टरांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात यश आले नाही.

हेही वाचा-उस्मानाबाद हादरले; 10 वर्षीय चिमुकलीवर पंरड्यात बलात्कार; पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू
बेमुदत काम बंद आंदोलन -
गेले दोन वर्ष निवासी डॉक्टर हे कोरोना सेवेमध्ये असल्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवलेला नाही. तेव्हा शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी मार्डतर्फे गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत मंत्री अमित देशमुख यांनीही या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतरही यावर ठोस कार्यवाही विभागाने केलेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

हेही वाचा-औरंगाबादमध्ये विविध मागण्यांसाठी मार्ड डॉक्टरांचा संप

रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता-

काम बंद आंदोलनात राज्यातील ५ हजारांहून अधिक डाॅक्टर्स सहभागी झाले आहेत. उद्या शनिवारीही आंदोलन सुरु राहिल्यास रुग्ण सेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, रुग्णसेवेवर परिणाम होणार नाही, याचे आश्वासन डाॅक्टरांकडून देण्यात आले आहे.
हेही वाचा-शिक्षणच नाही तर फी कशाची?; शैक्षणिक शुल्क माफ करण्याची निवासी डॉक्टरांची मागणी


डॉक्टरांची निदर्शने -
शुक्रवारी सकाळी केईम, सायन, नायर तसेच राज्य सरकारच्या जेजे रुग्णालयच्या मुख्य प्रवेशद्वारावर सेंट्रल मार्डचे प्रेसीडेंट डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील आणि जेजे अध्यक्ष व प्रेसीडेंट डॉ. गणेश साळुंके यांच्या नेतृत्वात प्रलंबित मागण्यांसाठी डॉक्टरांनी निदर्शने केली. राज्य सरका प्रलंबित मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.