ETV Bharat / city

Anil Deshmukh's Family Vs ED : मालमत्तेवरील जप्ती उठवा, अनिल देशमुखांच्या कुटुंबीयांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

author img

By

Published : Dec 5, 2021, 2:29 PM IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या कुटुंबीयांनी ईडीच्या (enforcement directorate) कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे. शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेवरील जप्ती उठविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अनिल देशमुख
अनिल देशमुख

मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Former Commissioner of Police Parambir Singh) यांनी 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणाचा आरोप लावल्यानंतर या प्रकरणाचा ईडीकडून (enforcement directorate) तपास सुरू आहे. या प्रकरणी ईडीने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकत त्यांची 4 कोटी 20 लाख रूपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली (Anil Deshmukh's property confiscated) आहे. अनिल देशमुख यांच्या कुटुंबियाकडून सदर मालमत्तेवरील जप्ती उठवण्यात यावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल करणयात आली आहे.

ईडीकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता
ईडीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पीएमएलए (PMLA) अंतर्गत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची 4 कोटी 20 लाखांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. देशमुख कुटुंबाची कंपनी मेसर्स प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड (Messrs. Premier Port Links Pvt Ltd) ही अनिल देशमुख यांची पत्नी आरती देशमुख (Aarti Deshmukh) यांच्या मालकिची आहे. आरती देशमुख यांच्या नावावर असलेला 1.54 कोटीचा वरळीच्या फ्लॅट आणि कंपनीच्या नावावर धुतूम गांव, उरण, रायगड येथे असलेली 2.67 कोटींची जमीन ईडीने जप्त केली आहे.

काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे (API Sachin Waze) यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे (Sanjeev Palande) आणि खासगी सहायक कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांनाही याचप्रकरणात दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) कोठडीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.