ETV Bharat / city

Maharashtra Assembly Session उपासभापतींच्या भाषणावेळीच सुरु झाला व्हिडिओ, आमदार शशिकांत शिंदेंची उडाली तारांबळ

author img

By

Published : Aug 17, 2022, 3:48 PM IST

विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे Neelam Gorhe यांचे भाषण सुरु होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे MLA Shashikant Shinde यांच्या लॅपटॉपमध्ये विधानसभेचे भाषण सुरु झाले. अचानक सुरु झालेल्या भाषणामुळे शिंदेंची तारांबळ उडाली. विरोधी पक्षातील एकनाथ खडसे, भाई जगताप आदी आमदार शिंदेंच्या मदतीला धावले.

Maharashtra Assembly Session
Maharashtra Assembly Session

मुंबई राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत Maharashtra Assembly Session राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या अभिनंदन प्रस्तावावर उपसभापती नीलम गोऱ्हे Neelam Gorhe यांचे भाषण सुरु होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे MLA Shashikant Shinde यांच्या लॅपटॉपमध्ये विधानसभेचे भाषण सुरु झाले. अचानक सुरु झालेल्या भाषणामुळे शिंदेंची तारांबळ उडाली. विरोधी पक्षातील एकनाथ खडसे, भाई जगताप आदी आमदार शिंदेंच्या मदतीला धावले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तोपर्यंत शालजोडीतले ठेवून दिले. अखेर कसाबसा व्हिडीओ बंद झाला आणि शिंदेंसह सर्वांना हायसे वाटले.



अभिनंदन प्रस्ताव : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात अनेक किस्से घडतात. पावसाळी अधिवेशनाच्या आज पहिल्याच दिवशी शशिकांत शिंदे यांची तारांबळ उडाल्याचे चित्र विधान परिषदेत पहायला मिळाले. त्याच झाले असे, भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे सभागृहनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे व शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दोन्ही नेत्यांचा जिवनपरिचय करुन दिला. सर्वांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.



...आणि शिंदेंची तारांबळ उडाली : उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती मुर्मु आणि उपराष्ट्रपती धनखड यांचा जीवनपट मांडत होत्या. हे दोन्ही व्यक्तीमत्व तळागाळातील असून खूप संघर्ष करुन हे सर्वोच्च स्थान मिळवले आहे. त्यांचे भाषण सुरु असतानाच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांच्या लॅपटॉपवर विधानसभेचे भाषण सुरु झाले. अचानक सुरु झालेल्या भाषणामुळे शिंदे गोंधळले. शिंदे बावरल्याचे लक्षात येताच, एकनाथ खडसे, भाई जगताप, अमोल मिटकरी आदी नेते शिंदेंच्या मदतीला धावले. अनेकांनी खूप वेळ प्रयत्न करुनही व्हिडीओ बंद होईना. त्यामुळे संपूर्ण सभागृह शिंदेकडे एकटक पाहू लागले. परिषदेत गोंधळ सुरु झाला. कुजबुज वाढली. वाढलेला गोंधळ लक्षात घेताच, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहातील सदस्यांना बारीक आवाजाकडे लक्ष देवू नका, इथे मोठ्या आवाजाने बोलतेय, ते ऐका अशी टिपण्णी केली. एकच यावेळी हशा पिकला. तोपर्यंत व्हिडीओही बंद झाला आणि शिंदे यांच्यासह सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

हेही वाचा - Fadwanis In Election Committee OF BJP भाजपच्या निवडणूक समितीत देवेंद्र फडवणीस यांचा समावेश, नितीन गडकरींना वगळले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.