ETV Bharat / city

आज लॉकडाऊनच्या निर्णयाची शक्यता - अस्लम शेख

author img

By

Published : Apr 13, 2021, 1:27 PM IST

Updated : Apr 13, 2021, 4:38 PM IST

निर्बंध लावूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाहीये. त्यामुळे आज लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

आज लॉकडाऊनच्या निर्णयाची शक्यता - अस्लम शेख
आज लॉकडाऊनच्या निर्णयाची शक्यता - अस्लम शेख

मुंबई : राज्यात लॉकडाऊनचा निर्णय आज घेतला जाऊन याची उद्या घोषणा केली जाऊ शकते असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे. निर्बंध लावूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाहीये. त्यामुळे आज लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

आज लॉकडाऊनच्या निर्णयाची शक्यता - अस्लम शेख

कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेऊ शकतात. तसेच लॉकडाऊनबाबत नियमावलीही आजच तयार होईल असे शेख यांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्यापासून मीटिंग घेऊन विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेत आहोत. टास्क फोर्सशी चर्चा झाली आहे. लोकांचीही मतं जाणून घेत आहोत. ब्रेक द चेननुसार शक्यतो आज निर्णय होईल. लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात चाचण्या जास्त

महाराष्ट्रात जास्त चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे केसेस वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. इतर राज्यांत केसेस कमी आहेत, मात्र 15 दिवसांनंतर तेथील रुग्णसंख्याही वाढेल असे त्यांनी म्हटले आहे. केंद्राने गेल्या वेळी कुणालाही न सांगता लॉकडाऊन लावला. पण आपल्या राज्यात अशी चूक व्हायला नको म्हणून काळजी घेतली जात आहे असे शेख यांनी म्हटले आहे. परप्रांतियांना घरी जाण्यासाठी कसलीही अडवणूक केली जात नसल्याचेही ते म्हणाले. मुंबईत नवीन जम्बो कोविड सेंटर उभे करण्यात येणार आहे. 5300 नवीन बेड तयार करणार आहोत असे शेख यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Apr 13, 2021, 4:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.