ETV Bharat / city

कोरोना मृत्यू अहवाल तपासूनच दिले जाते मृत्यू प्रमाणपत्र, राज्य आरोग्य विभागाचा दावा

author img

By

Published : Sep 6, 2021, 7:39 PM IST

राज्यात कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवली जात नाही. उलट कोरोना मृत्यूचा अहवाल तपासून मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते, असा दावा राज्य आरोग्य विभागाने केला आहे.

Ministry
मंत्रालय

मुंबई - कोरोनाचा फैलाव वाढल्यानंतर मृत्यूची संख्या झपाट्याने वाढली. मृत्यू प्रमाणपत्रही अनेकांना उशिरा मिळत असल्याची तक्रार आहे. उच्च न्यायालयानेही केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर साशंकता व्यक्त केली. महाराष्ट्रात कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारला घेरले. मात्र, राज्यात कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवली जात नाही. उलट कोरोना मृत्यूचा अहवाल तपासून मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते, असा दावा राज्य आरोग्य विभागाने केला आहे.

हेही वाचा - अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटींची मदत द्या, नरेंद्र पाटील यांची मागणी

डेथ ऑडिट करून प्रमाणपत्र

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला मृत्यू प्रमाणपत्र देण्यास विलंब लागत असल्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. मृताच्या परिवाराला मृत्यू प्रमाणपत्र वेळेवर मिळावे यसाठी केंद्र सरकारने ११ सप्टेंबरपूर्वी सुनिश्चित कार्यपद्धती बनवावी, असे निर्देश दिले आहेत. त्यावर महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता, प्रत्येक जिल्ह्यात डेथ ऑडिट कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. त्यात सर्व विभागांतील डॉक्टरांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या रुग्णावर करण्यात आलेल्या उपचाराची कागदपत्रे डेथ ऑडिट कमिटीसमोर सादर केली जातात. या कमिटीने कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे जाहीर केल्यास रुग्णालयातून कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र नातेवाईकांना दिले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या प्रमाणपत्रांची शहानिशा करण्यात येते.

मुंबईत असे होते डेथ ऑडिट

कोरोना रुग्णांना हार्ट अटॅक, रक्तदाब, श्वसनाचा त्रास, डायबेटीस, किडनी आदी आजार असल्यास त्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अशा रुग्णांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला, याबाबत संशय निर्माण केला जात होता. यासाठी राज्य सरकाराच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेने डेथ ऑडिट कमिटी स्थापन केली. या कमिटीमध्ये विविध आजारांशी संबंधित असलेल्या डॉक्टरांचा समावेश करण्यात आला. ज्या कोरोना रुग्णांचा मृत्यू होतो त्याच्या मृत्यूचे डेथ ऑडिट केले जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एखाद्याला कोरोना झाला आहे. त्याला इतरही आजार आहेत. अशा रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याबाबतची मृत्यूची कागदपत्रे डेथ ऑडिट कमिटीसमोर पाठवली जातात. त्याचे डेथ ऑडिट केले जाते. त्या रुग्णाचा मृत्यू होताना तो पॉझिटिव्ह असल्यास त्याची नोंद कोरोना पॉझिटिव्ह मृत्यू म्हणूनच केली जाते, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

१,३७,७७४ रुग्णांचा मृत्यू

राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ९४ हजार ७६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३७ हजार ७७४ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४८ लाख ५४ हजार १८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ८६ हजार १७४ (११.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९९ हजार ९०५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ५० हजार ९५ सक्रिय रुग्ण आहेत.

मृत्यूदर २.१२ टक्के

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्यूदर नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा - बाप्पा निघाले भारत-पाक सीमेवर; गणरायाची मूर्ती मुंबईहून काश्मीरसाठी रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.