ETV Bharat / city

Cyclone Tauktae : तौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार

author img

By

Published : May 17, 2021, 3:13 PM IST

तौक्ते चक्रीवादळ पश्चिम मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबईमध्ये कुलाबामध्ये प्रति ताशी १०२ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. या चक्रीवादळाचा वेग आता अधिक तीव्र होत आहे आणि त्याच बरोबर आज रात्री आठ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान ते गुजरातला धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

cyclone-toukte
cyclone-toukte

मुंबई - तौक्ते चक्रीवादळ पश्चिम मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबईमध्ये कुलाबामध्ये प्रति ताशी १०२ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. या चक्रीवादळाचा वेग आता अधिक तीव्र होत आहे आणि त्याच बरोबर आज रात्री आठ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान ते गुजरातला धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

माहिती देताना हवामान विभागाच्या अधिकारी
हवामान विभागाने मुंबईत तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच चक्रीवादळामुळे शहरातील लसीकरणही रद्द करण्यात आले आहे. केरळ, कर्नाटक व गोव्यात वादळाने धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीलाही रविवारी वादळाने तडाखा दिला. आता हे वादळ गुजरातकडे सरकू लागले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.