ETV Bharat / city

Cyclone Tauktae : मुंबापुरीला चक्रीवादळाचा तडाखा.. मुसळधार पावसाने मुंबई 'स्लो ट्रॅक'वर

author img

By

Published : May 17, 2021, 5:00 PM IST

Updated : May 17, 2021, 5:39 PM IST

हवामान विभागानं मुंबईत तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबई आज सकाळपासूनच 'स्लो ट्रॅक'वर आली आहे.

cyclone-tauktae in mumbai
cyclone-tauktae in mumbai

मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उठलेले तौक्ते नावाचे चक्रीवादळ सोमवारी सकाळी मुंबईच्या समुद्री हद्दीत दाखल झाले. मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. आज पहाटे चार वाजल्यापासून मुंबईत व उपनगरात वादळी वारे वाहू लागले असून सोबतच मूसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबईकरांच्या मनात धडकी भरू लागली आहे.

अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे कोसळलेल्या मुसळधार सोमवारी मुंबईला झोडपून काढले. पावसाची संततधार सुरु राहिल्याने मुंबईतील सखल भागात पाणी साचले. रस्ते, रेल्वे वाहतूकीवरही याचा परिणाम झाला. दरम्यान किंग्ज सर्कल, सायन, गांधी मार्केट, हिंदमाता, परळ, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, टिळकनगर, गोरेगाव येथील रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले होते.

मुंबईत मुसळधार पाऊस


मुंबईत मध्यरात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची संततधार सुरू होती. तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळत होत्या. सकाळी १० वाजल्यानंतर मुसळधार पर्जन्यवृष्टीस सुरवात झाली. शहर तसेच उपनगरात धो-धो पाऊस बरसला. त्यामुळे मुंबई जलमय झाल्याचे चित्र दिसून आले असता. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. परिणामी रस्ते वाहतूक रेंगाळली. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवेवर त्याचा परिणाम होऊन लोकल सेवा कोलमडली. सकाळची वेळ असल्याने कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचल्याने मुंबईकरांना यातून वाट काढावी लागली.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरातील दृष्य
..येथे पाणी साचले -गांधी मार्कट, किंग्जसर्कल, हिंदमाता, सायन रोड क्रमांक २४, समाज मंदिर हॉल, प्रतीक्षानगर, अ‍ॅन्टॉलहिल सेक्टर-७, वांद्रे -नॅशनल कॉलेज, शेल कॉलनी, चेंबूर, कु र्ला (एसटी आगार), मिलन सबवे आदी

अनेक ठिकाणी रस्ते बंद -

मध्यरात्री पासून आतापर्यंत शहरासह मुंबई शहरात ११, पूर्व उपनगरांत ६ व पश्चिम उपनगरांत १७ अशा एकूण ३४ ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्या. मात्र या घटनांत जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती पालिका आपत्कालीन विभागाने दिली. तोक्ते चक्रीवादळाचा मुंबईत जोरदार परिणाम पाहायला मिळत आहे. वादळ मुंबईला समांतर प्रवास करत गुजरातच्या दिशेने प्रवास करत आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे.

हिंदमाता परिसरात पाणी भरलं -

रात्रीपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी साचलेआहे. मुंबईच्या हिंदमाता परिसरात देखील पाणी भरले असून वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. महानगर पालिकेकडून पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अंधेरी मेट्रो स्टेशन परिसरात पाणी -

तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबईच्या अनेक रस्त्यावरपाणी साचले आहे. अंधेरी मेट्रो स्टेशन परिसरात पाणी साचले आहे. लॉकडाऊमुळे नागरिक आणि गाड्या रस्त्यावर नाहीत. त्यामुळे ट्राफिकच्या समस्या नाहीत. तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईच्या अनेक रस्त्यावरपाणी साचले आहे. अंधेरी मेट्रो स्टेशन परिसरात पाणी साचले आहे. लॉकडाऊमुळे नागरिक आणि गाड्या रस्त्यावर नाहीत त्यामुळे ट्राफिकच्या समस्या नाहीत.

221 झाडे उन्मळून पडले -

तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका आज मुंबईतील झाडांना बसला आहे. सुसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे संपूर्ण मुंबईत मिळून दुपारी 1 वाजेपर्यंत 221 झाडे उन्मळून पडल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे. त्याचवेळी झाडे पडून आतापर्यंत 15 गाड्यांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, ज्या महत्वाच्या, रहदारीच्या रस्त्यावर झाडे पडली आहेत, त्या ठिकाणची उन्मळून पडलेली झाडे हटवण्याचे काम सद्या वेगात सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Last Updated : May 17, 2021, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.