ETV Bharat / city

मनसेत प्रवेश करण्यासाठी 'कृष्णकुंज'बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

author img

By

Published : Jan 4, 2021, 3:45 PM IST

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची तयारी सुरू आहे. पक्षातील नेत्यांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षामध्ये नवीन कार्यकर्त्यांची भरती मोठ्या प्रमाणात सुरू असून, आज देखील राज ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या कृष्णकुंजबाहेर मनसेत प्रवेश करण्यासाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

मनसेत प्रवेश करण्यासाठी 'कृष्णकुंज'बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
मनसेत प्रवेश करण्यासाठी 'कृष्णकुंज'बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची तयारी सुरू आहे. पक्षातील नेत्यांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षामध्ये नवीन कार्यकर्त्यांची भरती मोठ्या प्रमाणात सुरू असून, आज देखील राज ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या कृष्णकुंजबाहेर मनसेत प्रवेश करण्यासाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

महाराष्ट्रात सक्रिय असणाऱ्या क्षितीज गृपच्या सदस्यांनी आज मनसेत प्रवेश केला आहे. तसेच पश्चिम उपनगरातील काही वकिलांसोबतच डोंबिवलीमधील अनेकांनी मनसेत प्रवेश केला आहे. राज्यात लवकरच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका लढवण्याचा मनसेने निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका या चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऍमेझॉनवर मराठी भाषा नसल्याच्या मुद्द्यावरून मनसेने नुकतेच आंदोलन केले होते. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नेमका कोणाता मुद्दा घेऊन मनसे निवडणूक लढवणार हे पाहाने महत्त्वाचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.