ETV Bharat / city

अंमली पदार्थाचे कारखाने उभे राहत असताना महाराष्ट्र सरकार झोपले का? - भाजप

author img

By

Published : Jan 22, 2021, 8:41 PM IST

केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या कारवाई वरून आता राज्यातील विरोधी पक्षाने महाविकस आघाडी सरकारला चांगलचं फैलावर घेतले आहे.

अतुल भातखळकर आणि आशिष शेलार
अतुल भातखळकर आणि आशिष शेलार

मुंबई - मुंबईत ड्रग्ज चे कारभार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो केला. घरातून चालणाऱ्या अमली पदर्थांच्या पेडलिंग च नेटवर्क उघडकीस आले. केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या कारवाई वरून आता राज्यातील विरोधी पक्षाने महाविकस आघाडी सरकारला चांगलचं फैलावर घेतले आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर

मुंबई पोलीस कारवाई कधी करणार?-

"नारकोटिक्स ब्युरो एनसीबीने मुंबईतील अवैध ड्रॅग रेकेट मध्ये दाऊद टोळीचा संबंध सापडला. राज्यातील माहविकास आघाडी सरकारने मुंबईत अमली पदार्थांचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी युद्ध पातळी वर काम केले पाहिजे. वांद्रे, खार, सांताक्रूझ मधील ड्रग्स हॉटस्पॉट्ससंदर्भात सीसी मुंबई पोलिसांना पत्र लिहिले आहे. मुंबई पोलीस कारवाई कधी करणार?" असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी माहाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.

गृहमंत्री केवळ सुडाचे राजकारण करण्यात मग्न-

"मुंबईत अंमली पदार्थाचे कारखाने उभे राहत असताना महाराष्ट्राचे गृह खाते आणि अंमलीपदार्थ विरोधी पथक झोपले आहे काय?" आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट मोडीत काढण्याचे सोडून राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाचे राजकारण करण्यात मग्न आहेत, असा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील अंमली पदार्थांची पाळेमुळे शोधून काढण्याची आवश्यकता-

भातखळकर म्हणाले की, एका आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाचे विशेष पथक ऑगस्ट मध्ये महाराष्ट्रात आले होते. या पथकाकडून राज्यातील बॉलीवूड व उद्योग विश्वात वाढत चाललेल्या ड्रग्सच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला. किमान त्यांनंतर तरी राज्याच्या गृह विभागाकडून मुंबईसह महाराष्ट्रातील अंमली पदार्थांची पाळेमुळे शोधून काढण्याची आवश्यकता होती. काल एनसीबीकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात तब्बल 12 किलो एमडी नामक ड्रग्स, 2 कोटी 28 लाख रुपये रोख, 2 रिव्हॉल्व्हर व काही जिवंत काडतुसे मिळाली. धक्कादायक बाब म्हणजे हा कारखाना मागील वर्षभरापासून तिथे चालू होता. हे सुद्धा उघडकीस आले आहे, असं भातखळकरांनी म्हटलंय.

हेही वाचा- Serum Institute Fire : सीरमला लागलेल्या आगीचा लसीकरणावर परिणाम नाही - मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.