ETV Bharat / city

Corona Update : राज्यात कोरोना रुग्णसंख्येतील चढउतार कायम, आज ६,३८८ नवे रुग्ण

author img

By

Published : Aug 12, 2021, 8:23 PM IST

Corona Update : राज्यात कोरोना रुग्णसंख्येतील चढउतार कायम, आज ६,३८८ नवे रुग्ण
Corona Update : राज्यात कोरोना रुग्णसंख्येतील चढउतार कायम, आज ६,३८८ नवे रुग्ण

सोमवारी राज्यात ४ हजार ५०५ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये मंगळवारी वाढ होऊन ५ हजार ६०९ रुग्णांची नोंद झाली. बुधवारी त्यात काही प्रमाणात घट होऊन ५ हजार ५६० नवीन रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यामध्ये वाढ होऊन ६ हजार ३८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, सोमवारी ६८, मंगळवारी १३७ तर बुधवारी १६३ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात वाढ होऊन आज २०८ मृत्यूंची नोंद झाली.

मुंबई - राज्यात सोमवारी ४ हजार ५०५ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये मंगळवारी वाढ होऊन ५ हजार ६०९ रुग्णांची नोंद झाली. बुधवारी त्यात काही प्रमाणात घट होऊन ५ हजार ५६० नवीन रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यामध्ये वाढ होऊन ६ हजार ३८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, सोमवारी ६८, मंगळवारी १३७ तर बुधवारी १६३ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात वाढ होऊन आज २०८ मृत्यूंची नोंद झाली. राज्यात गेले काही दिवस रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार सुरू आहे.

८,३९० रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात गुरुवारी ८,३९० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,७५,०१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८६ टक्के एवढे झाले आहे. मंगळवारी राज्यात ६,३८८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून २०८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३४,५७२ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०३,२६,८१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,७५,३९० (१२.६७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,९८,३९७ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ६२,३५१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यूदर २.११ टक्के -

१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.११ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - २८१
रायगड - ११५
अहमदनगर - ७४९
पुणे - ६९०
पुणे पालिका - ३१३
पिपरी चिंचवड पालिका - १७७
सोलापूर - ७१९
सातारा - ९१६
कोल्हापूर - ४६१
सांगली - ५६०
सांगली मिरज कुपवाडा पालिका - १०२
सिंधुदुर्ग - ११९
रत्नागिरी - १८५
उस्मानाबाद - १२६
बीड - १५९

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.