ETV Bharat / city

भाजप नेहमी दुतोंडी भूमिका घेणारा पक्ष, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

author img

By

Published : Mar 8, 2021, 8:14 PM IST

Updated : Mar 8, 2021, 8:22 PM IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा आणि शेतकऱ्यांना बळकटी देणारा आहे, असे माध्यमांशी बोलताना सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अर्थसंकल्पावर भाष्य करताना या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य लोकांना काहीतरी दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही सरकार म्हणून करू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा आणि शेतकऱ्यांना बळकटी देणारा आहे, असे माध्यमांशी बोलताना सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
भाजपच्या महिला आमदारांनी आज महिला दिनाच्या दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवरती काळ्या रंगाच्या साड्या घालून आंदोलन केले. त्यावरती नाना पटोले यांनी भाजपला दुतोंडी भूमिका घेणारा पक्ष अशी टीका केली आहे. नाना पटोले यांनी भाजपवरती सडकून टीका करत म्हणाले की, भाजप हा नेहमी एका बाजूवर ठाम नसणारा पक्ष आहे. त्यांचा निर्णय हा सातत्याने बदलत असतो. त्यामुळे दुतोंडी भूमिका घेणारा हा पक्ष आहे. आंदोलन करणार्‍या सगळ्या आमदार माझ्या भगिनी आहेत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवू पण ते ज्या पक्षात काम करतात त्या पक्षाची ही जी भूमिका आहे ती नेहमी दुतोंडी भूमिका आहे, असे नाना पटोले म्हणाले.नाना पटोले यांनी बंगालच्या निवडणुकीवर भाष्य करत संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतात आणि मिथुन चक्रवर्ती यांची भेट ही राजकीय नव्हती असं सांगत पुढच्या काही दिवसात मिथुन चक्रवर्ती हे भाजपमध्ये जातात. म्हणजे यावरून कळते की भाजपचे काम कोण करत आहे आणि संघाचा हा चेहरा आता उघड पडला आहे, अशी टीका देखील नाना पटोले यांनी केली.
Last Updated : Mar 8, 2021, 8:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.