ETV Bharat / city

काँग्रेसतर्फे मुंबईतील पदयात्रा म्हणजे भाजप सरकारविरोधात पुकारलेले ऐतिहासिक युद्ध - के. सी. वेणूगोपाल

author img

By

Published : Nov 14, 2021, 8:00 PM IST

Congress agitation in Mumbai
Congress agitation in Mumbai

काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली पदयात्रा हा देशातील सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे आणि या पदयात्रेच्या माध्यमातून आपण केंद्रातील भाजप सरकार विरोधात ऐतिहासिक युद्ध पुकारले आहे, असे वक्तव्य ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व राष्ट्रीय काँग्रेस नेते के. सी. वेणूगोपाल यांनी आज मुंबईत केले.

मुंबई - मागील 6 ते 7 वर्षांपासून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारकडून देशातील जनतेचे हाल सुरू आहेत. प्रचंड महागाई, पेट्रोल - डिझेल आणि घरगुती गॅसचे वाढते दर यांच्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे अक्षरशः मोडले आहे. आजची ही काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली पदयात्रा हा देशातील सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे आणि या पदयात्रेच्या माध्यमातून आपण केंद्रातील भाजप सरकार विरोधात ऐतिहासिक युद्ध पुकारले आहे, असे वक्तव्य ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व राष्ट्रीय काँग्रेस नेते के. सी. वेणूगोपाल यांनी आज मुंबईत केले.

वाढती बेरोजगारी आणि वाढत्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे आज मुंबईतील हिंदू कॉलनी दादर येथील राजगृह (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान) ते चैत्यभूमी, शिवाजी पार्क अशी पदयात्रा काढण्यात आली होती त्यावेळेस ते बोलत होते.

Congress agitation in Mumbai
काँग्रेसतर्फे मुंबईतील पदयात्रा
भाजपची उलटी गिनती सुरू -
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यावेळेस म्हणाले की, भाजप सरकार ने केलेल्या भरमसाठ महागाईबद्दल व वाढत्या बेरोजगारीबद्दल जनतेच्या मनामध्ये किती रोष आहे, हे या पदयात्रेतून संपूर्ण जगाने आज पाहिले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने शंभरी पार केली आहे. जो घरगुती गॅस सिलिंडर पूर्वी 400 रुपयांना मिळत होता, त्यासाठी आज 900 ते 1000 रुपये मोजावे लागत आहेत. देशातील महिलांवर आणि शेतकऱ्यांवर रोज अत्याचार होत आहेत. हेच का ते अच्छे दिन ज्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले होते? माझा नरेंद्र मोदींना आणि भाजपच्या नेत्यांना हा प्रश्न आहे.
Congress agitation in Mumbai
काँग्रेसतर्फे मुंबईतील पदयात्रा

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यावेळेस म्हणाले की, आजची पदयात्रा ही देशामध्ये मध्ये वाढत्या महागाई विरोधात, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या दरांच्या विरोधात, महिलांवर व शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात काढण्यात आली होती. मनमानी मोदी सरकारच्या अन्यायाविरोधात हा जनतेचा आवाज आहे आणि ही पदयात्रा म्हणजे केंद्रातील भाजप सरकारला इशारा आहे की, आता त्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी ध्यानात ठेवावे, असेही भाई जगताप म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.