ETV Bharat / city

Chandrakant Patil Statement : चंद्रकांत पाटलांना 'ते' वक्तव्य भोवणार?; राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल

author img

By

Published : May 26, 2022, 10:28 PM IST

चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंबाबात केलेल्या ( Chandrakant Patil Statement On Supriya Sule ) वक्तव्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली ( Complaint Against Chandrakant Patil To Women commission ) आहे.

Chandrakant Patil
Chandrakant Patil

पुणे - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खासदार सुप्रिया सुळेंबाबत वक्तव्य करताना जीभ घसरली ( Chandrakant Patil Statement On Supriya Sule ) होती. 'कशाला राजकारणात राहाता, घरी जा, स्वयंकाप करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची,' अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर चौफेर निशाणा साधण्यात येत आहे. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली ( Complaint Against Chandrakant Patil To Women commission ) आहे.

वकील असीम सरोदे यांच्या लॉ फर्ममधील वकिलांनी आणि कायद्याचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी राज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे ही तक्रार केली आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात नोटीस काढून त्यांचे मत मागवले जाईल, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

'म्हणून तक्रार करत आहोत' - भारतीय राज्य लिंगाच्या आधारावर भेदभाव न करण्याची हमी देते. परंतु, चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने समाजात एक संदेश पसरवला जात आहे की लिंगाच्या आधारावर महिलांमध्ये भेदभाव केला जाऊ शकतो. महिलांनी केवळ घरातील कामे करणे चांगले आहे. भारतीय समाजातील स्त्रिया समानता मिळवण्यासाठी धडपडत आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्यांमुळे महिलांच्या प्रतिष्ठेला शून्य पातळीवर नेऊन ठेवले आहे. म्हणूनच आम्ही चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तक्रार करत आहोत, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? - मध्यप्रदेशच्या सरकारने दोन दिवसांमध्ये दिल्लीत असं काय केले ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळालं, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारला विचारला होता. त्यावर, कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर केली होती.

हेही वाचा - Avinash Bhosale Arrested CBI : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना सीबीआयकडून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.