ETV Bharat / city

CM Eknath Shinde Statement : औरंगाबादचे प्रश्न सोडवण्यासाठी लागेल ती मदत करणार - मुख्यमंत्री

author img

By

Published : Jul 15, 2022, 1:51 PM IST

Updated : Jul 15, 2022, 5:25 PM IST

औरंगाबादचे बंडखोर आमदार संजय सिरसाट यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईत येऊन शक्तिप्रदर्शन केले. यावेळी संजय सिरसाट यांनी मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावत औरंगाबादच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

CM Eknath Shinde Statement About Sanjay Shirsat
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवाजी महारांजांना अभिवादन

मुंबई - औरंगाबाद येथील अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार संजय सिरसाट यांना लागेल ती मदत करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. शिवसैनिकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. संजय सिरसाट यांच्या समर्थनार्थ औरंगाबाद येथून मुंबईत आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बोलत होते.

आमदार संजय सिरसाट यांचे शक्तिप्रदर्शन - औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांच्या पुढाकाराने मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात औरंगाबादवरुन मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते. यावेळी या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना प्रतिसाद देत एकच जयघोष केला. संजय सिरसाट यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईत येऊन शक्तिप्रदर्शन केले.

  • संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांच्या पुढाकाराने मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात संभाजीनगर हून मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी जयघोषात समर्थन देत उदंड प्रतिसाद दिला. #realshivsena pic.twitter.com/ApT7WpkjWs

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शिवसैनिकाला मिळवून देणार लाभ - औरंगाबादवरुन आमदार संजय सिरसाट यांचे हजारो समर्थक मुंबई येथे पोहोचले आहेत. या कार्यकर्त्यांचा आज रविंद्र नाट्यमंदिरात मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी औरंगाबादच्या शिवसैनिकाला सत्तेचे लाभ मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली. त्यासाठी लवकरच औरंगाबाद येथे येऊन नागरी प्रश्न सोडवणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

या आमदारांची होती उपस्थिती - रविंद्र नाट्यमंदिरात आमदार संजय सिरसाट यांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यासह आमदार सदा सरवणकर, आमदार यामिनी जाधव, आमदार डॉ. बालाजी किणीकर, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के तसेच औरंगाबाद येथून आलेले हजारो शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते.

Last Updated : Jul 15, 2022, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.