ETV Bharat / city

Maharashtra Politics Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र सुरुच, महामंडळातील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

author img

By

Published : Jul 19, 2022, 1:19 PM IST

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या ( BJP ) पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर ठाकरे सरकारनं ( Thackeray Govt ) घेतलेले निर्णय रद्द केले आहेत. शिंदे यांनी महामंडळातील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.

महामंडळातील नियुक्त्या रद्द
महामंडळातील नियुक्त्या रद्द

मुंबई - राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाविकास आघाडीने ( Maha Vikas Aghadi Govt ) घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता महामंडळातील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करत आणखी एक धक्का दिला आहे.

अहवाल 7 दिवसात सादर करण्याचे आदेश - ठाकरे सरकारच्या काळात महामंडळमधील अशासकीय सदस्यांचे नियुक्ती करण्यात आली होती. हे निर्णयांना स्थगिती देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना सर्व विभागांच्या कार्यवाहीचा अहवाल 7 दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विविध महामंडळे, समित्या, सार्वजनिक उपक्रमातील नियुक्त्यांचा यात समावेश आहे.

सर्व कामांना स्थगिती देण्याचा निर्णय - एकनाथ शिंदे यांनी आधीच 1 एप्रिल 2021 पासून कामाला स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या कामाच्या निविदा केल्या नाहीत. मात्र, काम मंजूर झाली आहेत, अशा सर्व कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा नियोजन समितीमार्फत केलेल्या सर्व कामांना देखील समिती दिली आहे. 2022- 23 च्या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीद्वारे प्रस्तावित सर्व कामांना स्थगिती दिली होती. नव्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतरच नवी कामे मंजूर करणार असल्याचे म्हटले होते.

राज्यातील विकास कामांना स्थगिती देऊ नका, अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांना विनंती - विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition leader Ajit Pawa ) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( Nationalist Congress ) वरीष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारने ( Maha Vikas Aghadi ) सुरु केलेल्या राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी केली.

अतिवृष्टी ग्रस्तांना नुकसान भरपाईची मागणी - राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थितीने नुकसान झालेल्या शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना नुकसान भरपाई व मदतीचे तातडीने वितरण करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदनही यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, दत्तात्रय भरणे आदी आमदार यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - CM Eknath Shinde In Delhi : आमच्याकडे १२ नव्हे १८ खासदार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीत गौप्यस्फोट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.