ETV Bharat / city

...म्हणून कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खोल्यांच्या निर्णयाला देण्यात आली स्थगिती; आव्हाडांचा खुलासा

author img

By

Published : Jun 23, 2021, 9:16 PM IST

टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी लालबाग येथील सुखकर्ता को. ऑप. सोसायटी या म्हाडाच्या इमारतीत खोल्या देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याप्रकरणी स्थानिक रहिवाशांकडून तक्रार करण्यात आली होती. रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेऊन, या संदर्भातील निर्णयाला पुढील अहवाल येईपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. परंतु त्यानंतर 24 तासांच्या आत त्याच परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शंभर खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड

मुंबई- टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी लालबाग येथील सुखकर्ता को. ऑप. सोसायटी या म्हाडाच्या इमारतीत
खोल्या देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याप्रकरणी स्थानिक रहिवाशांकडून तक्रार करण्यात आली होती. रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेऊन, या संदर्भातील निर्णयाला पुढील अहवाल येईपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. परंतु त्यानंतर 24 तासांच्या आत त्याच परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शंभर खोल्या उपलब्ध करून दिल्याची माहिती, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. ही बैठक होण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना बोलावून घेतले, आणि त्याच परिसरात असलेल्या बॉम्बे डाईंग येथे शंभर खोल्या उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली, अशी जी चर्चा सुरू होती तिला पूर्णविराम मिळाला आहे.

जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद

मुख्यमंत्र्यांना आमदारांची काळजी - आव्हाड

कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुरुवातील लालबाग येथील सुखकर्ता को. ऑप. सोसायटीमध्ये शंभर खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र स्थानिकांनी यावर अक्षेप घेतला. याबाबत येथील रहिवाशांनी शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांच्याकडे तक्रार केली होती. चौधरी यांनी स्थानिकांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती देण्याचे निर्देश दिले. यावरू जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या आमदारांची काळजी असल्याचा चिमटा काढला होता.

संबंधित इमारतीमध्ये 750 कुटुंबांचे वास्तव्य

मुंबईच्या टाटा रुग्णालयात हजारो कॅन्सरग्रस्त उपचार घेत आहेत. मात्र राहिला जागा नसल्याने त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होतो. राहिला जागा नसल्याने त्यांची गैरसोय होते. रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन, जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते लालबागमधील सुखकर्ता को. ऑप सोसायटी या म्हाडाच्या इमारतीत टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडातर्फे 100 खोल्यांचे वितरण केले होते. या इमारतीमध्ये इतरही 750 कुटुंबे राहातात त्यांनी याबाबत तक्रार केली होती. या रहिवाशांची तक्रार आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली होती. या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली होती.

हेही वाचा - रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आठवड्यात दुसऱ्यांदा शरद पवारांची घेतली भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.