ETV Bharat / city

Mumbai Rain Update Today - मुंबईत आज ढगाळ वातावरण, काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

author img

By

Published : Sep 16, 2022, 10:37 AM IST

मुंबईमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला ( Mumbai Rain Update ) आहे. मुंबईत गेले काही दिवस पाऊस पडत असून आज ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाने दिल्याचे पालिकेकडून कळवण्यात आले ( Cloudy weather with light to moderate rain ) आहे.

Mumbai
मुंबई

मुंबई : मुंबईत १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान पावसाचा यलो अलर्ट ( Yellow alert for rain ) देण्यात आला आहे. मुंबईत गेले काही दिवस पाऊस पडत असून आज ढगाळ वातावरण असणार आहे. साधारण पाऊस पडणार असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. ( Mumbai Rain Update )

पावसाचा येलो अलर्ट : मुंबईत जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला काही दिवस चांगला पाऊस पडला. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली होती. गणेशोत्सव सुरू होताच पुन्हा पावसाने हजेरी लावली. सप्टेंबर महिन्यात 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान मुंबईत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला ( Yellow alert for rain in Mumbai ) आहे. यादरम्यान मुंबईत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ( Cloudy weather today in Mumbai )

वाहतूक सुरळीत : गुरुवार १५ ते आज शुक्रवारी १६ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासात शहर विभागात ३७.७१, पूर्व उपनगरात ४३.३८ तर पश्चिम उपनगरात ३६.८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत पाऊस पडत असला तरी रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

दरवर्षी केले जाते पालिकेकडून आवाहन : पावसाळा दरम्यान जोराच्या पावसाने दरडी कोसळण्याची, तसेच पावसामुळे डोंगरावरुन येणा-या पावसाच्या पाण्याच्या लोंढयामुळे, जोरदार पावसाने नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडण्याची शक्यता असल्याने रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे महापालिका प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येते. स्थलांतर न करता तेथेच राहणा-या रहिवाशांनी स्वतःच्या जबाबदारीवर रहावे, नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे महापालिकेकडून कळविले जाते.


ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.