ETV Bharat / city

पी-305 बार्ज : दुर्घटनेला बार्जचा कॅप्टन जबाबदार; कर्मचाऱ्याचा आरोप

author img

By

Published : May 20, 2021, 8:13 PM IST

अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे आँईल अँड नँचरल गँसचे 'बार्ज बुडाले होते. या बार्जवर २७३ कर्मचारी काम करत होते. यातील २२० जणांची नौदलाने सुटका केली.

पी-305 बार्ज
पी-305 बार्ज

मुंबई - अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे आँईल अँड नँचरल गँसचे 'बार्ज बुडाले होते. या बार्जवर २७३ कर्मचारी काम करत होते. यातील २२० जणांची नौदलाने सुटका केली. या बार्जवरील कर्मचारी अजूनही बेपत्ता आहेत. नौदलाने बार्जवरील अनेकांचे प्राण वाचवले आहेत. त्यापैकी एक असलेले रेहमान शेख यांनाही नौदलाने सुखरुप वाचवले आहे. शेख यांच्यावर सध्या ताडदेवच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेला बार्जचा कॅप्टन जबाबदार असल्याचे शेख यांनी सांगितले आहे.

तौत्के चक्रीवादळ आले त्यावेळी बार्ज पी-३०५ ही मुंबईच्या समुद्रात ३४ नाँटीकल माईल आत होती. या बार्जवर रेहमान शेख हे चिफ इंजिनिअर म्हणून काम करत होते. चक्रीवादळात बार्जचा नांगर तुटला आणि बार्ज बुडाले. जीव वाचवण्यासाठी बार्जमधील कर्मचाऱयांनी पाण्यात उड्या टाकल्या. त्यावेळी शेख यांनीही पाण्यात उडी मारली होती. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नौदलाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र, चक्रीवादळाची कल्पना असताना देखील बार्जवरील कर्मचाऱ्यांना वेळीच सुखरूप ठिकाणी का हलवण्यात आले नाही, असा प्रश्न आता शेख यांचे भाऊ आलम शेख यांनी उपस्थित केला आहे.

सध्या रेहमान शेख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती आता चांगली आहे. या दुर्घटनेत शेख यांच्या उजव्या पायाला, डाव्या हाताला आणि छातीला गंभीर मार लागला असल्याचे शेख यांच्या भावाने सांगितले. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी यलोगेट पोलीस ठाण्यात ADR दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.