ETV Bharat / city

Breaking news live page; बिश्नोई टोळीने सलमान खान आणि सलीम खान यांच्या नावाने धमकीची पत्रे लिहिली -सुत्राची माहिती

author img

By

Published : Jun 9, 2022, 7:01 AM IST

Updated : Jun 9, 2022, 10:27 PM IST

Breaking news live page 9 June 2022
Breaking news live page 9 June 2022

22:24 June 09

बिश्नोई टोळीने सलमान खानला धमकी देणारे पत्र ठेवले होते- सुत्राची माहिती

मुंबई- बिश्नोई टोळीने सलमान खान आणि सलीम खान यांच्या नावाने धमकीची पत्रे लिहिली होती. हे पत्र ठेवण्यासाठी बिष्णोई टोळीचे तीन जण मुंबईत आले होते.

21:01 June 09

सेनेचे 53, अपक्ष 12 आमदारांची हॉटेल ट्रायडेंट येथे बैठक सुरू

मुंबई- शिवसेनेच्या आमदारांची आणि समर्थकांची बैठक सुरू आहे. बैठकीत निवडणुकी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिवसेना आमदार, विनोद अगरवाल, नरेंद्र बोंडे, विनोद निकोले, शंकरराव गडाख, राजेंद्र पाटील-यड्रावक, मंजुषा गावित, गीता जैन, आशिष जयस्वाल, बच्चू कडू, किशोर जोरगेवार, चंद्रकांत पाटील, राजकुमार पटेल बैठकीला उपस्थित आहेत.

19:48 June 09

मुंबई उपनगरातील वांद्रे, खार, सांताक्रूझ, अंधेरी आणि विलेपार्ले परिसरात मुसळधार पाऊस

मुंबई- मुंबई उपनगरातील वांद्रे, खार, सांताक्रूझ, अंधेरी आणि विलेपार्ले परिसरात काळ्या ढगांसह मुसळधार पाऊस पडत आहे.

18:55 June 09

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक

मुंबई - राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीला प्रफुल पटेल, छगन भुजबळ, शरद पवार, अजित पवार बैठकीला उपस्थित होते.

18:43 June 09

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये घर कोसळून एकाच घरातील तिघांचा मृत्यू

अहमदनगर- जिल्ह्यातील संगमनेरमध्ये घर कोसळून एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील आकलापुर येथे वादळीवाऱ्यात घर कोसळून एकाच घरातील तिघांचा मुत्यु झाल्याची घटना घडली आहे .तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

17:32 June 09

उद्योगपती अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

मुंबई- उद्योगपती अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ईडीकडून जप्त केलेली संपत्ती खाली करण्याचे निर्देशाला उच्च न्यायालयाची स्थगिती दिले आहे. अविनाश भोसले यांची पुणे येथील ईडीने जप्त केलेली संपत्ती खाली करण्यासाठी नोटीस दिले होते.

16:55 June 09

दोन दिवसात राज ठाकरे घेणार पुण्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची शाळा, मनसे नेते मोरे यांची माहिती

पुणे- मनसेच्या पुणे संघटनेत सध्या अंतर्गत वाद सुरू आहेत. पुण्याचे माजी शहराध्यक्ष व सध्याचे मनसे सरचिटणीस असलेले वसंत मोरे यांच्यावर अन्याय होत असल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहेत. त्यामुळेच मोरे समर्थक नाराज होऊन मनसेचा राजीनामा देत आहेत.

15:44 June 09

पंकजा मुंडे यांना उमदेवारी न मिळाल्याने समर्थकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

अहमदनगर - माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावले जाते, असा आरोप होत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी न दिल्याने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी रोगर हे किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

15:29 June 09

राष्ट्रपती पदासाठी १८ जुलैला निवडणूक, २१ जुलैला मतदान - राष्ट्रीय निवडणूक आयोगाची घोषणा

नवी दिल्ली- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख आज जाहीर होणार ( Presidential Election 2022 ) आहे. घटनेच्या अनुच्छेद 62 चा संदर्भ देत याबाबतची घोषणा निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. राष्ट्रपती पदासाठी १८ जुलैला निवडणूक, २१ जुलैला मतदान होणार असल्याची निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे.

15:20 June 09

अनिल देशमुख विरोधात ईडी प्रकरणात सचिन वाझेकडून ​माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा

मुंबई- सीबीआय प्रकरणात माफीचा साक्षीदार झाल्यानंतर सचिन वाझे याने ईडी प्रकरणातील माफीचा साक्षीदारसाठी कोर्टासमोर इच्छा जाहीर केली आहे.

15:09 June 09

अनिल देशमुख, नवाब मलिक यांचा मतदानासाठी परवानगीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

मुंबई- राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी न्यायालयात अर्ज केला होता

14:50 June 09

मुंबई उच्च न्यायालयाची सीबीआय महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यासह केंद्र सरकराला नोटीस जारी

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाची सीबीआय महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यासह केंद्र सरकराला नोटीस जारी करण्यात आली आहे. जयस्वाल यांच्या सीबीआयच्या महासंचालकपदी झालेल्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मुंबई पोलिसाच्या सेवानिवृत्त एसीपी राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

13:49 June 09

संजय राऊत यांना शिवडी न्यायालयाचे समन्स

मुंबई - शिवडी न्यायालयाने प्रा. डॉ. मेधा किरीट सोमय्या यांच्या बदनामीच्या तक्रारीची दखल घेतली आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना 4 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स कोर्टाने काढले आहे.

12:10 June 09

अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

मुंबई - अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार हायकोर्टात तातडीची सुनवणी घेण्यात येत आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यापुढे सुनवणी सुरू आहे. दरम्यान मुंबई सत्र न्यायालयात देशमुख आणि मलिकांच्या मतदानाच्या परवानगीवरही थोड्याच वेळात निकाल अपेक्षित आहे.

11:20 June 09

मोबाईल चोरीवरून तरुणाची मारहाण करुन खून प्रकरणी चार जणांना अटक

मुंबई - भांडुप परिसरात मोबाईल चोरीच्या संशयावरून एका तरुणाची चार जणांनी बेदम मारहाण केली.त्यात त्याचा मृत्यू झाला होता. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे मुलुंड पोलिसांनी सांगितले आहे.

11:16 June 09

सौरभ कांबळे उर्फ ​​महाकाळच्या चौकशीसाठी मुंबईचे पथक पुण्यात

पुणे - सलमान खान धमकी पत्र प्रकरणी डीसीपी संग्रामसिंह निशानदार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांचे पथक सौरभ कांबळे उर्फ ​​महाकाळची चौकशी करण्यासाठी पुण्यातील स्थानिक गुन्हे शाखेत पोहोचले. ते तिथेच त्याची चौकशी करणार

10:42 June 09

तीन दिवसात चार जणांचा उष्मघाताने मृत्यू झाल्याची संशय

नागपूर - नागपूरसह विदर्भात मागील चार ते पाच दिवसात तापमान सरासरी 45 अंशाच्या घरात आहे. यातच उष्म वाढलेला आहे. दुपारी रस्ते सुनसान होताना दिसून येत आहेत. तीन दिवसात चार जणांचा उष्मघाताने मृत्यू झाल्याची संशय व्यक्त केला जात आहे.

10:08 June 09

देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी होणार भाजपची महत्त्वाची बैठक

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी होणार भाजपची महत्त्वाची बैठक. देवेंद्र फडणवीस यांच्या करोना चाचणी अहवालाची प्रतीक्षा. त्यानंतर बैठक होण्याची शक्यता

09:18 June 09

साफसफाईसाठी विहिरीत उतरलेल्या 6 पैकी 5 युवकांचा मृत्यू

बालाघाट (म.प्र) - साफसफाईसाठी विहिरीत उतरलेल्या 6 पैकी 5 युवकांचा मृत्यू ( Well cleaning 5 youth died kudan balaghat ) झाल्याची घटना जिल्ह्यातील कुदान गावात घडली आहे. साफसफाई करत असताना विहिरीतील खालच्या भागात विषारी वायू गळती झाल्याने सर्व युवक बेशुद्ध झाले. गावकऱ्यांनी त्यांना कसेबसे विहिरीतून बाहेर काढले आणि बिरसा रुग्णालयात नेले.

07:57 June 09

भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगाकडून राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांना समन्स

मुंबई - भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करण्याकरिता राज्य सरकारकडून गठीत करण्यात आलेल्या आयोगाकडून राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांना समन्स पाठवून भीमा कोरेगाव प्रकरणावर आपले मत काय हे प्रतिज्ञापत्राद्वारे 30 जूनपर्यंत आयोगासमोर सांगण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

07:55 June 09

वांद्रे परिसरात तीन मजली इमारत कोसळली, १ ठार

मुंबई - वांद्रे परिसरात काल रात्री १२:३० च्या सुमारास तीन मजली इमारत ( Building collapsed in Bandra area in Mumbai ) कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना वांद्रे येथील शास्त्रीनगर भागातील आहे.

06:57 June 09

Breaking news live page 9 June 2022, बिश्नोई टोळीने सलमान खान आणि सलीम खान यांच्या नावाने धमकीची पत्रे लिहिली -सुत्राची माहिती

सलमान खान
सलमान खान

मुंबई- शिवसेनेच्या आमदारांची आणि समर्थकांची बैठक सुरू आहे. बैठकीत निवडणुकी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिवसेना आमदार, विनोद अगरवाल, नरेंद्र बोंडे, विनोद निकोले, शंकरराव गडाख, राजेंद्र पाटील-यड्रावक, मंजुषा गावित, गीता जैन, आशिष जयस्वाल, बच्चू कडू, किशोर जोरगेवार, चंद्रकांत पाटील, राजकुमार पटेल बैठकीला उपस्थित आहेत.

अहमदनगर - माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावले जाते, असा आरोप होत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी न दिल्याने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी रोगर हे किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख आज जाहीर होणार ( Presidential Election 2022 ) आहे. घटनेच्या अनुच्छेद 62 चा संदर्भ देत याबाबतची घोषणा निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. राष्ट्रपती पदासाठी १८ जुलैला निवडणूक, २१ जुलैला मतदान होणार असल्याची निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे.

२६ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काल संध्याकाळी उशिरा एका बीएमसी कर्मचाऱ्याला अटक केली आहे. आयपीसीच्या कलम ३७६ अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

Last Updated : Jun 9, 2022, 10:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.