ETV Bharat / city

Maharashtra Breaking News : कुर्ल्यातून 4 कोटी रुपयांचे ड्रग जप्त; दोन तस्करांना अटक

author img

By

Published : Jun 17, 2022, 6:31 AM IST

Updated : Jun 17, 2022, 7:18 PM IST

ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग न्यूज

19:16 June 17

कुर्ल्यातून 4 कोटी रुपयांचे ड्रग जप्त; दोन तस्करांना अटक

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने कुर्ला परिसरातून सुमारे 4 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून, दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे.

15:15 June 17

मुंबई उच्च न्यायालय परिसरात माजी सैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई - उच्च न्यायालयात एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तुषार शिंदे नावाच्या 55 वर्षीय माजी सैनिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. पीडित माजी सैनिकाचे संपत्तीच्या वादाचे प्रकरण आहे. मात्र, बंदोबस्तावर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटन टळली. उच्च न्यायालयातील पोलिसांनी शिंदे यांना ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास सुरू आहे.

13:11 June 17

साताऱ्यात अनैतिक संबंधातून मुलांसह महिलेचा खून

सातारा- एका महिलेचा खून करून तिच्या दोन मुलांना विहिरी मध्ये ढकलून खून केला आहे. कोरेगाव तालुक्यातील वेलंग शिरंबे येथे घटना घडली आहे.

12:42 June 17

आजही भाजप आणि त्यांच्या आघाडीला पूर्ण बहुमत नाही - संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

मुंबई - राज्यसभेच्या हाय होल्टेज निवडणुकीनंतर सध्या विधान परिषद निवडणुकीची चर्चा सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकासआघाडीतील नाराजी समोर आली. प्रमुख तिनही पक्षांचे नेते 'सब कुछ चंगा सी' म्हणत असले तरी तीनही पक्षांची नाराजीची खदखद लपून राहिलेली नाही. त्यातच आता आघाडीचा मुख्य पक्ष असलेल्या शिवसेनेने प्रत्येकाने आपापल्या बघा अशी भूमिका घेतल्याने काँग्रेस मात्र टेन्शनमध्ये आहे. यासोबतच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीने सुद्धा आता चर्चेला वेग आला आहे. यासंदर्भात आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

12:12 June 17

अग्नीवीर योजनेविरोधातील आंदोलनातील तरुणाचा तेलंगणात मृत्यू

  • #WATCH | Bihar: The residence of Deputy CM Renu Devi, in Bettiah, attacked by agitators during their protest against #AgnipathScheme

    Her son tells ANI, "Our residence in Bettiah was attacked. We suffered a lot of damage. She (Renu Devi) is in Patna." pic.twitter.com/Ow5vhQI5NQ

    — ANI (@ANI) June 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हैदराबाद - तेलंगणातही निदर्शनाच्या घटना समोर आल्या आहेत. आंदोलकांनी येथील सिकंदराबाद रेल्वे स्थानकाची तोडफोड केली. सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर जमलेल्या तरुणांनी एनडीए सरकारच्या विरोधात निदर्शने केली. जुन्या धर्तीवर भरती करण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलकांनी हैदराबाद ते कोलकाता जाणाऱ्या ईस्ट कोस्ट रेल्वेला आग लावली. हिंसक आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापरही केला. येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. आठ जणांना गोळ्या लागल्या आहेत. निर्मल असे मृताचे नाव सांगितले जात आहे.

11:42 June 17

'अग्निपथ' योजना आणून मोदी सरकारने केली देशातील बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा

मुंबई - 'अग्निपथ' ही चार वर्षासाठी भारतीय सैन्यातील भरती म्हणजे आयुष्यभराची बेरोजगारी असून ही योजना आणून मोदी सरकारने देशातील बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा केली आहे असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. एकीकडे 'वन रँक वन पेंशन' अशी योजना करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरीकडे बेरोजगार तरुणांसाठी 'अग्निपथ' अशी योजना आणून त्यात 'नो रँक नो पेंशन नो ग्रॅज्युईटी' आणतात. त्यामुळे ही योजनाच बंद करून केंद्रसरकारने तरुणांसाठी कायमस्वरूपी योजना आणावी अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

11:32 June 17

कोकण विभागाचा राज्यात सर्वाधिक 99.27 टक्के निकाल

पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल हा जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली असून सर्व विभागातून कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक 99.27 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी नाशिक विभागाचा 95.90 एवढा लागला आहे.अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

11:03 June 17

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदारांची बोलावली तातडीची बैठक

मुंबई - सह्याद्रीवर चार वाजता सर्व आमदारांची शिवसेनेने बैठक बोलाविली आहे. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आहे. राज्यसभा निवडणुकीत झालेल्या चुका विधान परिषदेच्या निवडणुकीत होऊ नये म्हणून ही बैठक बोलाविण्यात आली आहे. बैठक झाल्यावर सर्व आमदार हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी जाणार आहे.

11:00 June 17

बिहारचे उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या घरावर आंदोलकांचा हल्ला

  • #WATCH | Bihar: The residence of Deputy CM Renu Devi, in Bettiah, attacked by agitators during their protest against #AgnipathScheme

    Her son tells ANI, "Our residence in Bettiah was attacked. We suffered a lot of damage. She (Renu Devi) is in Patna." pic.twitter.com/Ow5vhQI5NQ

    — ANI (@ANI) June 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाटणा- बिहारमध्ये अग्नीपथ योजनेविरोध तरुणांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या घरावर आंदोलकांनी हल्ला केला आहे. त्यांच्या मुलाने सांगितले, की घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर उपमुख्यमंत्री रेणू देवी या पाटणामध्ये आहेत.

10:55 June 17

बोरिवली पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला केली अटक

मुंबई - बोरिवली पश्चिम पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्या विरोधात मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एक नाही तर अनेक गुन्हे दाखल आहेत. हेमंत राजन देशपांडे उर्फ ​​हेमू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

10:39 June 17

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे अजित पवार यांची घेणार भेट

अजित पवार
अजित पवार

मुंबई - विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. मतांच्या जुळवाजुळवसाठी महा विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खलबत्ते सुरू आहेत. मंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला जाणार आहेत.

09:14 June 17

पालघरमध्ये अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू, बलात्कार करून खून केल्याचा प्राथमिक अंदाज

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

पालघर- जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वडपाडा येथील 16 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. दहावीची परीक्षा दिलेली अल्पवयीन मुलीचा मृतदेह वडपाडा गावापासून काही अंतरावर मिळून आला आहे. मंगळवार पासून ती बेपत्ता होती. ती सापडत नाही म्हणून कुटुंबियांनी बुधवारी मिसिंगची तक्रार जव्हार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. बुधवारी सायंकाळी मात्र गावकऱ्यांना तिचा मृतदेह आढळला आहे.

09:12 June 17

राष्ट्रपती निवडणुकीबाबत राजनाथ सिंह यांचा मुख्यमंत्र्यांना फोन !

मुंबई -18 जुलैला राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. त्यासाठी विरोधकांची नुकतीच एक बैठक 15 जुलैला दिल्लीत पार पडली. मात्र भाजपकडूनही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्यावरून देशाचे संरक्षण मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गुरुवारी संध्याकाळी फोन वरून सवांद साधला

08:41 June 17

अग्निपथ योजनेविरोधात बिहारमध्ये तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू

  • Bihar: Agitating against #AgnipathRecruitmentScheme, protesters set a train ablaze at Luckeesarai Junction.

    "They were stopping me from shooting a video & even snatched away my phone. 4-5 compartments affected. Passengers alighted & managed to proceed on their own," Police say. pic.twitter.com/bcxUchBpXy

    — ANI (@ANI) June 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाटणा- केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात बिहारमध्ये शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. आंदोलकांमध्ये प्रामुख्याने सरकारच्या चार वर्षांच्या योजनेविरोधात नाराजी व्यक्त करणाऱ्या तरुणांचा समावेश आहे. बक्सरमध्ये तिसऱ्या दिवशीही हजारो विद्यार्थी रेल्वे ट्रॅकवर उतरले. पहाटे ५ वाजल्यापासून डुमराव रेल्वे स्थानकाची यूपी आणि डाऊन लाईन ठप्प, विद्यार्थी रुळावर धरणे धरून बसले आहेत. अनेक गाड्या अडकल्या आहेत.

08:33 June 17

मुलानेच बापाचा दोरीने गळा आवळून केला खून

कोंढवा पोलीस स्टेशन
कोंढवा पोलीस स्टेशन

पुणे- मद्यप्राशन करून त्रास देत असल्याच्या कारणातून मुलानेच मावसभावाच्या साथीने आपल्या पित्याचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतून मृतदेह दुचाकीवरून मध्यरात्री बोपदेव घाटातील सेल्फी पॉइंट परिसरात टाकून दिला होता. कोंढवा पोलिसांनी खूनाचा छडा लावून राज्याबाहेर रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी मुलाला व त्याच्या मावस भावाला रेल्वे स्टेशन येथून अटक केली आहे.

08:02 June 17

मुंबई पोलिसांकडून 4 कोटी 60 लाख रुपये एमडी ड्रग्ज जप्त, 29 वर्षीय तरुणाला अटक

जप्त केलेले ड्रग्ज
जप्त केलेले ड्रग्ज

मुंबई- मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करांनी विरोधात मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. कुर्ला परिसरातून 3070 ग्राम एमडी जप्त केले आहे. यामध्ये मुंबई पोलिसांनी 29 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेली ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात 4 कोटी 60 लाख रुपये अंदाजे किंमत असलेले माहिती मिळाली आहे.

06:25 June 17

साताऱ्यात अनैतिक संबंधातून मुलांसह महिलेचा खून

पणजी -दिल्लीस्थित रहिवाशाने गोव्यातील वागातोर समुद्रकिनाऱ्यावर 4चाकी चालवण्याचा आनंद लुटला. मात्र गाडी चालवण्याच्या नादात त्यांची गाडीच समुद्राच्या पाण्यात रुतून बसली.

Last Updated : Jun 17, 2022, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.