ETV Bharat / city

अहमदनगरमध्ये हनीट्रॅपचा पुन्हा प्रकार, बागायतदाराला अश्लील व्हिडिओ काढून लाखोंना लुटले

author img

By

Published : Jun 12, 2022, 6:27 AM IST

Updated : Jun 12, 2022, 1:29 PM IST

ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग न्यूज

13:27 June 12

अहमदनगरमध्ये हनीट्रॅपचा पुन्हा प्रकार, बागायतदाराला अश्लील व्हिडिओ काढून लाखोंना लुटले

अहमदनगर- जिल्ह्यातील पुन्हा एकदा हनी ट्रॅपचा प्रकार समोर आला आहे. एका श्रीमंत बागायतदाराकडून उसनवारी घेतलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने बोलवत महिलेने अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले. त्यानंतर बागायतदाराला लाखोंनी लुटत ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना शिर्डीत घडली आहे.

13:18 June 12

नाशिक जिल्ह्यातील गवलडी गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई

नाशिक जिल्ह्यातील गवलडी गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई

नाशिक - राजकीय नेते लोक केवळ आश्वासने देतात. गावात पाणी नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंबामागे ५० रुपये सरंपचाला देतो. त्यानंतर ते पाण्याचे टँकर मागवित असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

13:08 June 12

अपक्ष आमदारांची थेट नाव उघड करणार्‍या संजय राऊतांवर कारवाई करा - किरीट सोमैय्या

मुंबई -अपक्ष आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली नाही, असे म्हणत सहा अपक्ष आमदारांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप केला. या आरोपावर भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला आहे. हा निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आहे. या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

12:12 June 12

आयपीएल मीडिया हक्कांचा मुंबईत लिलाव सुरू

  • Uddhav Ji has received an invite to June 15 meeting in Delhi. As we will be in Ayodhya at that time, a prominent leader of our party will take part in the meeting: Shiv Sena leader Sanjay Raut on Mamata Banerjee invites Opposition leaders for a meeting ahead of Presidential polls pic.twitter.com/Xc6a4L8aVR

    — ANI (@ANI) June 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई - आयपीएल मीडिया हक्कांचा लिलाव मुंबईत सुरू झाला आहे. पॅकेज ए, म्हणजेच टीव्ही हक्क, 74 सामन्यांसाठी 49 कोटी रुपये प्रति सामन्याची मूळ किंमत आणि पॅकेज बी- 33 कोटी रुपयांच्या आधारभूत किंमतीसह डिजिटल अधिकारांचा लिलाव सुरू होणार आहे.

11:08 June 12

उद्धव ठाकरे यांना 15 जूनला दिल्लीत होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण - संजय राऊत

मुंबई - उद्धव ठाकरे यांना 15 जूनला दिल्लीत होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण मिळाले आहे. त्यावेळी आम्ही अयोध्येत असल्याने आमच्या पक्षाचे एक प्रमुख नेते बैठकीत भाग घेणार असल्याची माहिती खासदार तथा शिवसेना नेते संजय राऊत दिली आहे. त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीसाठी ममता बॅनर्जींना आमंत्रित केले आहे.

11:01 June 12

एनसीबी मुंबई तर्फे ड्रग्ज सप्लायर आणि पेडलर्स विरुद्ध मोठी कारवाई, 4.88 किलो चरस जप्त, 2 आरोपींना अटक

  • Maharashtra | NCB Mumbai seized 4.880 kg Charas on June 10 and arrested two persons the next day. The seized drugs were concealed in a special cavity made inside a water purifier. The parcel was destined for Australia, said the agency. pic.twitter.com/hOZf7KnJrB

    — ANI (@ANI) June 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई- एनसीबी मुंबई तर्फे ड्रग्ज सप्लायर आणि पेडलर्स विरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. 4.88 किलो चरस जप्त करून शनिवारी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

10:37 June 12

संभाजी राजेंच्या समर्थकांकडून शिवसेना भवनाबाहेर बॅनर

मुंबई - राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा दुसरा उमेदवार असलेले संजय पवार यांचा पराजय झाला. तर भाजपाचे धनंजय महाडिक जिंकले. या विजयानंतर भाकपकडून शिवसेनेवर टोमणे मारले जात असताना, छत्रपती संभाजी राजे यांच्या समर्थकांनी थेट शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी केली आहे.

10:30 June 12

हिमायतनगर येथे वीज कोसळून शेतकरी गंभीर जखमी

नांदेड - मृग नक्षत्राच्या तिसऱ्या दिवशी हिमायतनगर शहर व परिसरात वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन पाऊस झाला. दरम्यान शहरानजीक एका झाडावर वीज कोसळली, याच वेळी घराकडे येत असलेल्या शेतकरी येथून येत असताना कोसळलेल्या विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.

10:09 June 12

मुंबईत गेल्या २४ तासात शहरात सर्वाधिक पावसाची नोंद, वाहतूक सुरळीत

मुंबई - मुंबईत शुक्रवारी रात्री पासून पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुंबईत पाऊस दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. गेल्या २४ तासात मुंबई शहर विभागात सर्वाधिक तर पूर्व उपनगरात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

09:48 June 12

दिल्लीत सापडला ग्रेनेड, एनएसजीकडून वेळीच करण्यात आला निकामी

  • Yesterday, a grenade was recovered & later defused by an NSG team in the Yamuna Khader area under the Mayur Vihar Police Station limits; an FSL examination is being conducted: Delhi Police

    — ANI (@ANI) June 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नवी दिल्ली- शनिवारी मयूर विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यमुना खडेर परिसरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) पथकाने एक ग्रेनेड जप्त केला आणि नंतर निकामी केला. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) परीक्षा घेतली जात आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

07:23 June 12

नुपूर शर्मा यांना मुंबई पोलिसांचे समन्स, 25 जूनला चौकशीला हजर राहण्याचे निर्देश

मुंबई- भाजपच्या तत्कालीन राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या ( Nupur Sharma in trouble ) अडणीत दिवसेंदिवस वाढ होत आहेत.आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना 25 जून रोजी तिचे म्हणणे नोंदवण्यासाठी ( Mumbai Police summons Nupur Sharma ) समन्स बजावले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात नुपूर शर्मा यांनी मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांना भाजप पक्षाने प्रवक्ता पदावरून निलंबित केले आहे.

06:34 June 12

बाप-लेकाचा दुकानाचा वाद, स्वतःला जाळून घेण्याचा तरुणाचा प्रयत्न

ठाणे -मुंब्रा पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या दुकानाच्या मालमत्तेच्या वादातून बाप आणि मुलाच्या भांडणात लहान मुलगा मनोज चौरासिया याने पोलिसांसमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. अत्यवस्थ मनोज चौरासिया याला केइएम रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

06:11 June 12

अहमदनगरमध्ये हनीट्रॅपचा पुन्हा प्रकार, बागायतदाराला अश्लील व्हिडिओ काढून लाखोंना लुटले

नांदेड - मृग नक्षत्राच्या तिसऱ्या दिवशी हिमायतनगर शहर व परिसरात वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन पाऊस झाला. दरम्यान शहरानजीक एका झाडावर वीज कोसळली, याच वेळी घराकडे येत असलेल्या शेतकरी येथून येत असताना कोसळलेल्या विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.

श्रीनगर- लष्कर तोयबाशी संबंधित असलेले तीन दहशतवादी सुरक्षा दलाच्या कारवाईत ( three killed terrorists in Pulwama ) ठार झाले आहेत. यामध्ये शहीद रियाझ अहमद यांची हत्या करणाऱ्या जुनैद शीरगोजरी ( Pulwama linked with LeT ) या दहशतवाद्याचा समावेश असल्याचे काश्मीरचे आयजीपी विजय कुमार ( IGP Kashmir Vijay Kumar ) यांनी सांगितले.

Last Updated : Jun 12, 2022, 1:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.