ETV Bharat / city

BMC BJP Corporators Agitation : बीएमसीत भाजपा नगरसेवकांचे स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन

author img

By

Published : Jan 21, 2022, 6:30 PM IST

मुंबई महानगरपालिका निवडणूक ( Mumbai Municipal Corporation Election ) जवळ येत असतानाच भाजपा आणि शिवसेनेनेतील वाद ( Dispute between Shiv Sena and BJP Corporators ) वाढू लागला आहे. आज स्थायी समितीमध्ये बोलू दिले जात नाही असा आरोप करत भाजपा नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनीही भाजपाविरोधात घोषणाबाजी केली.

BMC BJP Corporators Agitation
भाजपाचे ठिय्या आंदोलन

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणूक ( Mumbai Municipal Corporation Election ) जवळ येत असतानाच भाजपा आणि शिवसेनेनेतील वाद वाढू लागला आहे. आज (शुक्रवारी) स्थायी समितीमध्ये बोलू दिले जात नाही असा आरोप करत भाजपा नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनीही भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. भाजपच्या नगरसेवकांना बैठकांमध्ये बोलू दिले जात नसल्याचा आरोप भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. तर सर्वात जास्त भाजपाच्या नगरसेवकांना बोलायला दिले जाते, यामुळे भाजपचे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष याहसवणात जाधव यांनी सांगितले.

बीएमसीत भाजपा नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

भाजपा शिवसेना आमने सामने -

राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून भाजपकडून शिवसेनेला लक्ष केले जात आहे. पालिकेतील कामात, कोविडसाठी केल्या जाणाऱ्या खर्चात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप भाजपकडून करण्यात आले आहेत. यासाठी भाजपाने याआधीही स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौरांच्या दालनाबाहेर आंदोलने केली आहे. आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये डीपीडीसीच्या फंडामधून काम करण्याचा प्रस्ताव आला असता यावर बोलू दिले नाही असा आरोप करत भाजपाच्या नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी शिवसेना आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनातून बाहेर येऊन शिवसेनेच्या नगरसेवकांनीही भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली.

बोलू दिले जात नसल्याने आंदोलन -

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत याआधी टॅबचा प्रस्ताव, पोयसर नदीचा प्रस्ताव आला होता. पालिकेने चढ्या दरात टॅब खरेदी केले आहेत. तसेच ७०० कोटी खर्च असलेल्या पोयसर नदीच्या कामाची रक्कम वाढून १४०० कोटींवर गेली आहे. या सारख्या अनेक प्रस्तावावर आम्हाला बोलायला दिले नाही. आज डीपीडीसीच्या फंडामशून मुंबईमध्ये काम करण्याचा प्रस्ताव आला होता. यावर आम्हाला बोलायचे होते. मात्र आम्हाला बोलायला न देताच तो प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ही लोकशाहीची गळचेपी असल्याने भाजपच्या नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर आंदोलन केल्याचे भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

'आरोप बिनबुडाचे'

स्थायी समितीच्या बैठकांमध्ये आलेल्या प्रस्तावावर जास्तीत जास्त भाजपच्या नगरसेवकांना बोलायला दिले जाते. त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नसल्याने बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. न्याय पद्धतीने त्यांनी चुकीचे काम असल्यास त्यांनी ते सिद्ध करावे. आम्हीही त्यांना नक्की उत्तरे देऊ. भाजपावाल्याना सर्वाधिक बोलायला देऊनही बोलू दिले जात नाही हे बोलणे चुकचीचे आहे. हा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे असे स्थयी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. भाजपचे आमदार निवडून विधानभवनात गेले आहेत. तरीही त्यांना काहीही माहीत नसताना पालिकेवर आरोप करत आहेत. यांचा जीव पालिकेत अडकला आहे. गेल्या २५ वर्षाचा भ्रष्टाचार बाहेर काढताना त्यामधील २१ ते २२ वर्षे तुम्हीही आमच्या सोबत होतात मग त्यावेळी तुम्ही का बोलला नाहीत, आताच का आरोप करताय असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला आहे. आमचा भ्रष्टाचार बाहेर काढताना कोविड काळात पंतप्रधानांच्या पीएम केअर फंडामध्ये जो पैसे गेला त्याचा हिशोब दिला जात नाही याबाबत बोला असे आवाहन जाधव यांनी केले.

हेही वाचा - Congress Manifesto in UP : काँग्रेसचे युवा घोषणापत्र प्रसिद्ध; 20 लाख तरूणांना देणार रोजगार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.